सोन्यावर जीएसटी: दिवाळीआधीच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता जीएसटीचे केवळ 5 व 18 टक्के असे दोन स्लॅब असणार आहेत. तसंच, 12 आणि 28 टक्के असलेला स्लॅब हटवण्यात येणार आहे. मीठापासून ते कारपर्यंतच्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. अशातच सोनं-चांदीवरील जीएसटी कमी झालाय की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. दिवाळीनंतर लगेचच लग्नसराईंना सुरुवात होईल. आत्ताच सोनं थेट एक लाखांवर पोहोचलं आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता जीएसटी कर रचनेत बदल झाल्यामुळं ग्राहकांना आता तरी सोनं खरेदी करणं आवाक्यात आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे.
सोनं आणि चांदीवर 3 टक्के जीएसटी लागणार आहे. तर, घडणावळीवर (Making Charges)वर 5 टक्के जीएसटी लागू असणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक लाख रुपयांची सोनं-चांदी खरेदी करत असाल तर तर साधारणपणे तुम्हाला 3 हजार रुपयांपर्यंत जीएसटी द्यावा लागणार आहे. हे नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. ज्यामुळे दिवाळीच्या घरगुती खर्चात त्याचा थेट परिणाम जाणवेल.
दरम्यान, 3 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. दिल्ली-मुंबईत सोन्याच्या दराने एक लाखांचा टप्पा गाठला होता. तर. आज 4 सप्टेंबर रोजी मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,06,860 रुपयांवर स्थिरावले असून 110 रुपयांनी घसरले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली असून 97,950 रुपयांवर स्थिरावली आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 90 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 80,140 रुपयांवर पोहोचली आहे.
FAQ
1. केंद्र सरकारने जीएसटी संदर्भात कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे?
केंद्र सरकारने जीएसटी कर रचनेत बदल करून 12 आणि 28 टक्के स्लॅब हटवले असून, आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोन स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.
2. सोने आणि चांदीवरील जीएसटी दरात काय बदल झाला आहे?
सोने आणि चांदीवर 3 टक्के जीएसटी लागू राहणार आहे, तर घडणावळीवर (Making Charges) 5 टक्के जीएसटी लागू होईल.
3. नवीन जीएसटी दर कधीपासून लागू होणार आहेत?
नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील.
































