Homeदेश-विदेशअल्मोरा जिल्हा उत्तराखंडमधील भूस्खलन व्हिडिओमध्ये थेट एखाद्या व्यक्तीला मारहाण करते

अल्मोरा जिल्हा उत्तराखंडमधील भूस्खलन व्हिडिओमध्ये थेट एखाद्या व्यक्तीला मारहाण करते


भूस्खलन व्हिडिओ: पावसाळ्यामध्ये अनेकदा दरड कोसळल्याच्या बातम्या ऐकायला, पाहायचा किंवा चर्चेत दिसून येतात. सामान्यपणे जोरदार पाऊस झाल्यानंतर दरड पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते असं दिसून येतं. पावसाचं पाणी दगडांमधील भेगांमध्ये जातं आणि या दगडांची पकड सुटून ते डोंगरकड्यांवरुन कोसळतात. कधी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा प्रभाव असतो की संपूर्ण डोंगरकडाच कोसळतो. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या घाटांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे अनेकदा रस्ते वाहतुकीवर परिणाम होतो. महाराष्ट्राप्रमाणेच डोंगराळ भागांमध्ये असलेल्या राज्यांमध्येही वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडल्याचं पाहायला मिळतं. खास करुन ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अशाप्रकारे दरड कोसळण्याच्या घटना वरचेवर घडत असतात.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

दरड कोसळू लागली अन्…

दरड कोसळून वाहनांचं नुकसान होण्याबरोबरच जिवितहानी झाल्याचंही अनेकदा पाहायला मिळालं. मात्र दरड पडते तेव्हा डोंगराळ भागांमधून प्रवास करणाऱ्या किंवा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. दरड पडण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीला हलक्यात घेणं जीवावर बेतू शकतं किंवा यामध्ये गंभीर दुखापत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीसोबत घडला. दरड कोसळत असताना दरडीच्या मार्गातून लवकर बाजूला होण्याचं भान या व्यक्तीला राहिलं नाही आणि एक भलामोठा दगड या व्यक्तीला लागला. पुढे जे झालं ते अधिक भयानक होतं.

कुठे घडला हा सारा प्रकार?

हा सारा प्रकार उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यामधील भिकियासैण येथे घडला. या ठिकाणी अचानक डोंगरकड्यावरील दगड खालून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळू लागले. दरड कोसळत असल्याचं पाहून अनेकांनी तिथून पळ काढला. मात्र यापैकी एक व्यक्ती तुलनेनं संथ गतीनं पळत असतानाच डोंगरावरुन आलेला एक मोठा दगड तिच्या डोक्याला लागला आणि ही व्यक्ती थेट खाली कोसळली. हा सारा प्रकार याच रस्त्यावर काही अंतरावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला. हे सारं एवढ्या वेगाने घडलं की या व्यक्तीला पळून जाण्याचा वेळही मिळाला नाही.

स्थानिकांनी जीव धोक्यात घालून वाचवलं

स्थानिक तरुणांनी हिंमत दाखवत जीव धोक्यात घालून या व्यक्तीला दरड कोसळत असलेल्या मार्गातून दूर आणलं. चार ते पाच लोकांनी जखमी व्यक्तीला उचलून दरड कोसळत असलेल्या मार्गातून बाहेर काढलं. रक्तबंबाळ अवस्थेत या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्यक्तीच्या प्रकृतीसंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.

FAQ

अल्मोडा जिल्ह्यातील काय घडलं?
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैण येथे डोंगरकड्यावरील दगड रस्त्यावर कोसळले. एका व्यक्तीला मोठा दगड डोक्याला लागला, ज्यामुळे ती खाली कोसळली. ही घटना एका व्यक्तीने मोबाईल कॅमेरामध्ये रेकॉर्ड केली.

डोंगराळ भागात प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी?
दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीला हलक्यात न घेता सतर्क राहणे, जलदगतीने सुरक्षित ठिकाणी जाणे आणि स्थानिक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

व्यक्तीला कशी मदत मिळाली?
स्थानिक तरुणांनी शौर्य दाखवत जखमी व्यक्तीला दरड कोसळत असलेल्या मार्गातून बाहेर काढले. चार ते पाच लोकांनी त्या व्यक्तीला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!