पृथ्वीकडे जाताना एलियन: पृथ्वीचं अस्तित्वं असणाऱ्या सूर्यमालेमध्ये इतरही अनेक गोष्टी असून, खगोलशास्त्रज्ञांकडून आणि अवकाश क्षेत्रातील अभ्यासकांकडून सातत्यानं या क्षेत्रासंदर्भातील नवनवीन माहिती जाहीर केली जाते. नवा ग्रह सापडणं असो किंवा ताऱ्यांचा स्फोट होणं असो, विविध देशांचा अंतराळ संशोधन संस्था कायमच अवकाशाशी संबंधिकत भारावणारी माहिती समोर आणत असतात. यावेळी मात्र ही माहिती काहीशी चिंता वाढवणारी आहे.
सूर्यमालेत अनपेक्षित पाहुण्यांची एंट्री?
अवकाशातून संशोधकांना मिळालेले संकेत काहीसे तिंचेच टाकणारे असून, सध्याच्या घडीला ही चिंता वाढवणारा विषय ठरतेय ती म्हणजे पृथ्वीच्या सौरमारेल आलेली एक बाह्यवस्तू किंवा एक पिंड. शास्त्रीय भाषेत त्याचा उल्लेख ‘इंटरस्टेलर ऑब्जेक्ट’ म्हणून केला जात आहे. हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ अवी लोएब यांच्या माहितीनुसार हा सर्वसाधारण पिंड नसून, कथित स्वरुपात तो एलियननं पाठवलेला असू शकतो.
या पिंडासमवेत एल लहान यानही प्रवास करत असून, ते मंगळाच्या दिशेनं जात असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे यान 3I/Atlas च्या काहीसं पुढे असून, 3 ऑक्टोबर 2025 ला ते मंगळ ग्रहाच्या अगदी जवळून पुढे जाईल.
3 आय/एटीए म्हणजे काय?
3I/Atlas एक इंटरस्टेलर ऑब्जेक्ट अर्थात एक असा पिंड आहे जो दुसऱ्या सूर्यमालेतून इथं आला आहे. त्याचा वेग ताशी 209000 किमी असून प्रति सेकंद वेग 60 किमी इतका आहे. या पिंडाचं आयुर्मान 7 अब्ज वर्षे असून, ते आपल्या सूर्यमालेहूनही अधिक असल्याचं सांगण्याचत येतं. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 3I/Atlas जेव्हा मंगळाच्या अतिशय नजीक पोहोचेल तेव्हा हे अंतर फक्त 2.7 लाख किमी इतकंच असेल. अशी एखागी वस्तू ग्रहाच्या इतकी जवळ येणं शक्य नसल्यानं त्या पिंडाची दिशा जाणीवपूर्वक बदलण्यात आल्याचा दावा लोएब यांनी केला आहे.
3I/Atlas च्या पुढे एक लहान यान चालत असून, ते यान मंगळावर उतरण्याची प्रतीक्षा करु शकतं असाही दावा त्यांनी केला आहे. हे यान आकारानं इतकं लहान आहे की पृथ्वीवरील दुर्बिणीनं ते पाहणं अशक्य आहे लोएब यांच्या सल्ल्यानुसार टोही ऑर्बिटरच्या हायराईज कॅमेरानं त्याबाबतची माहिती मिळवत पुढील तपास करता येऊ शकतो असं त्यांचं मत.
एलियन खरंच हल्ला करणार?
लोएब यांनी सदर संशोधनात आणखी एक दावा केला असून, एलियनकडून पृथ्वीवर लक्ष ठेवण्यासोबतच हल्लाही केला जाऊ शकतो. ज्यामुळं त्यांनी जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांसह प्रशासनालाही सतर्कतेचा इसारा दिला आहे. लोएब यांचा हा वैयक्तिक दावा असून, शास्त्रज्ञांनी मात्र तो नाकारत हा अवकाशातील एक सामान्य पिंड असल्याचं स्पष्ट केलं आहे. असं असलं तरीही 3I/Atlas नं संपूर्ण अवकाश क्षेत्राच्या जीवाला घोर लावला असं म्हणायला हरकत नाही.
FAQ
3 आय/एटीए म्हणजे काय?
3I/ATLAS (C/2025 N1) हा एक इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे, जो आपल्या सूर्यमालेतून नसून दुसऱ्या ताऱ्याच्या प्रणालीतून आला आहे. तो 1 जुलै 2025 रोजी NASA च्या ATLAS (Asteroid Terrestrial-impact Last Alert System) टेलिस्कोपद्वारे शोधला गेला.
3I/ATLAS पृथ्वीच्या जवळ येणार आहे का?
नाही, 3I/ATLAS पृथ्वीला कोणताही धोका नाही. तो पृथ्वीपासून किमान 1.6 खगोलीय एकक (AU) (सुमारे 240 दशलक्ष किमी) अंतरावर राहील. त्याचा पृथ्वीशी सर्वात जवळचा बिंदू 19 डिसेंबर 2025 रोजी असेल.
3I/ATLAS सोबत लहान यान आहे का?
अवी लोएब यांनी असा दावा केला आहे की, 3I/ATLAS सोबत एक लहान यान प्रवास करत आहे, जे मंगळावर उतरण्याची शक्यता आहे. हे यान इतके लहान आहे की पृथ्वीवरील टेलिस्कोपने ते शोधणे अशक्य आहे.































