आज सोन्याचे दर: आज सोनं-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होताना दिसत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 500 रुपयांनी वाढले आहे. सोनं पुन्हा एकदा एक लाखांच्या पार पोहोचलं आहे. तर चांदीदेखील 506 रुपयांनी वाढून 1,16,456 रुपयांवर पोहोचले आहे. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं 3400 डॉलरच्या आसपास पाहायला मिळतेय. तर चांदीदेखील 1 टक्क्यांनी घट होऊन 38.5 डॉलरवर पोहोचलं आहे.
दिल्लीच्या सराफा बाजारात स्टॉकिस्ट आणि वैश्विक मंदीमुळं सोमवारी सोनं 200 रुपयांनी कमी होऊन 1,00,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. 99.5 टक्के शुद्धता असलेले सोनंदेखील 150 रुपयांनी 99,900 रुपये 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची वाढ झाली असून 1,02,060 रुपयांवर पोहोचले आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची घट होऊन 93,550 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 410 रुपयांची वाढ झाली असून 76,550 रुपयांवर स्थिरावली आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 93,550 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,060 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,550 रुपये
ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,305 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,151 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,614 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 74, 440 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81, 208 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60, 912 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 93,550 रुपये
24 कॅरेट- 1,02,060रुपये
18 कॅरेट- 76,550 रुपये
FAQ
1) 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यात काय फरक आहे?
-24 कॅरेट: 99.9% शुद्ध सोने, गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
-22 कॅरेट: 91.6% शुद्ध सोने, दागिन्यांसाठी वापरले जाते (8.4% इतर धातू मिसळलेले).
-18 कॅरेट: 75% शुद्ध सोने, अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरले जाते (25% इतर धातू).
2) मुंबई आणि पुण्यात सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
– सोन्याची शुद्धता तपासा (हॉलमार्क किंवा स्टॅम्प).
-विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.
-मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.
-खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.
3) सोन्याच्या किंमती दररोज किती वेळा बदलतात?
सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.
































