Homeदेश-विदेशमुकेश अंबानी शेजारी एन चंद्रशेकरन नेटवर्थ बिझिनेस न्यूज

मुकेश अंबानी शेजारी एन चंद्रशेकरन नेटवर्थ बिझिनेस न्यूज


मुकेश अंबानिस शेजारी कोण आहे: मुंबईत असे अनेक उच्चभ्रू परिसर आहेत, जिथं शहरातील बड्या उद्योजकांपासून ते अगदी सेलिब्रिटी मंडळींपर्यंत बरेचजण वास्तव्यास असतात. अशीच एक व्यक्ती देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात मुकेश अंबानीची शेजारी आहे.

जाणून आश्चर्य वाटलं ना? अंबानींची शेजारी असणाऱ्या या व्यक्तीचं टाटा उद्योग समुहाशी एक खास नातं. स्वर्गीय रतन टाटा यांच्या विश्वासूंपैकी एक असणाऱ्या एन चंद्रशेखर यांच्यावर या समुहाची मोठी धुरा असून, तेच अंबानींचे शेजारी आहेत.

चंद्रशेखर यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाहून कमी नाही. तामिळनाडूतील एक लहानसं खेडं असणाऱ्या मोहनूरमध्ये एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. रतन टाटा यांच्या इतक्या जवळच्या व्यक्तीमध्ये आपल्या कुटुंबातील लेकाचा सहाभाग असेल याची त्यांच्या कुटुंबीयांना पुसटशी कल्पनाही नव्हती.

कोईंबतूरच्या इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून त्यांनी अप्लाईड सायन्समधून शिक्षण घेतलं, एनआयटी त्रिची इथून त्यांन एमसीएचं शिक्षण पूर्ण केलं आणि 1987 पासून ते टाटा समुहात कार्यरत झाले. इंटर्न म्हणून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आता संचालक अर्थात चेअरमनपदापर्यंत आला आहे. 2009 मध्ये त्यांना टीसीएसच्या सीईओपदी नियुक्त करण्यात आलं. 2017 पासून ते या समुहात चेअरमनपदी कार्यरत आहेत.

अंबानींचे शेजारी…

एन चंद्रशेखर मुंबईत वास्तव्यास असून, त्यांचं घर मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाशेजारीच असल्याचं म्हटलं जातं. 2022 मध्ये त्यांनी मुंबईतील 33 साऊथ टॉवरमध्ये एक आलिशान ड्युप्लेक्स घर खरेदी केलं. ज्याची किंमत आहे 98 कोटी रुपये. दक्षिण मुंबईमध्ये असणाऱ्या चंद्रशेखर यांच्या या निवासस्थानी अनेक सोयीसुविधा असून, सुरुवातीला त्यांनी हे घर 5 वर्षाच्या भाडेतत्त्वावर घेतलं होतं. ज्यानंतर एक मोठी रक्कम मोजत त्यांनी हेच घर खरेदी केलं.

दक्षिण मुंबईत जिथं बहुतांश बड्या उद्योजकांची निवासस्थानं आहेत त्याच उच्चभ्रू भागात चंद्रशेखर यांचं निवासस्थान असून त्यांच्या घरामध्ये प्रायवेट लिफ्ट, उच्चस्तरिय सुरक्षाव्यवस्था, सी व्यू, क्लब हाऊस, वेलनेस सेंटर आणि लक्झरी कार पार्किंग अशा एक ना अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

चंद्रशेखर यांना किती पगार मिळतो?

टाटा उद्योग समुहात चेअरमनपदी असणाऱ्या एन चंद्रशेखर यांचा पगार दरवर्षी वाढत असतो. 2021-22 मध्ये त्यांचा पगार 109 कोटी इतका होता. 2023-24 मध्ये तो 135.3 कोटी झाल्याचं पाहायला मिळालं. 2025 या आर्थिक वर्षात त्यांचा पगार 155.81 कोटी रुपये इतका असल्याचं सांगण्यात येतं. भारतात सर्वाधिक पगार मिळणाऱ्या कॉर्पोरेट एक्झेक्युटीव्हमध्ये चंद्रशेखर यांच्या नावाचा समावेश होतो. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडासुद्धा मोठा असून हा आकडा 855 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विभागाच्या भिंती तोडणे, योजनेचा प्रभाव जमिनीवर दिसणे आवश्यक आहे

0
नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी...

Gemini Financial Gains & Capricorn Promotion Likely: Tuesday Tarot Horoscope 2026

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंकमंगळवार, 30 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील आणि समाजात त्यांचा मान वाढेल. कन्या राशीच्या लोकांना नवीन भागीदाराकडून...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...
spot_img

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...

Bajaj Pulsar N125 भारतात बंद

0
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
error: Content is protected !!