Homeदेश-विदेशयूएसएचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मराठीत ताज्या...

यूएसएचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मराठीत ताज्या बातम्या पूर्ण केल्या


पुतीन ट्रम्प बैठक: (America Russia) अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्ता राष्ट्रांमध्ये घडणाऱ्या लहानमोठ्या घडामोडींचे परिणाम सर्वदूर जगभरातील इतर देशांपर्यंतही दिसून येतात. त्यातच सर्वाधिक मोठी घडामोड नुकतीच घडली असून, जागतिक स्तरावर सर्वच माध्यमांचं लक्ष या एका बहुप्रतिक्षित भेटीकडेच लागल्याचं स्पष्ट झालं. ही भेट होती रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या जगातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींची. अर्थात, ही भेट होती व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची.

(Alaska) अलास्काच्या एंकोरेज इथं ट्रम्प आणि पुतिन यांची भेट झाली आणि या बैठकीतून पश्चिमी रशियातील तणावावर काही अंशी तोडगा निघाल्याचंही म्हटलं गेलं. शुक्रवारी साधारण तीन तासांसाठी पुतिन आणि ट्रम्प यांच्याल मोठी शिखर बैठक आणि चर्चा झाली. ज्यानंतर या दोन्ही नेत्यांनी माध्यमांना संबोधित केलं. 2018 मध्येसुद्धा पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी होत साऱ्या जगाचं लक्ष वेधलं होतं. दरम्यान, यावेळच्या भेटीची संधी साधत पुतिन यांनी इतिहास, भूगोल आणि अमेरिकेसह असणाऱ्या ‘शेजारी’ राष्ट्र धोरणांवर अधिक भर दिला. युक्रेनसोबतच्या युद्धबंदीसंदर्भातील अटींवर मात्र त्यांनी कोणत्याही स्वरुपातील स्पष्टोक्ती दिली नाही.

अमेरिकी शिष्टाचार विसरले पुतिन?

अमेरिकी शिष्टाचारानुसार जेव्हा इतर कोणत्याही देशाचे राष्ट्रपती किंवा इतर कोणत्याही परदेशी नेत्याचं आपल्या देशात आगमन होत झालं असता (उच्च पदस्थ व्यक्ती अमेरिकेच्या पाहुण्यांपैकी एक असल्यानं) संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये यजमानपद भूषवणाऱ्या अमेरिकेच्याच राष्ट्राध्यक्षांनीच सर्वप्रथम माध्यमांसमोर बोलणं अपेक्षित असतं. मात्र पुतिन यांनी ही परंपरा खंडित केल्याचं शुक्रवारी पाहायला मिळालं.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी फक्त रशियन भाषेतच पत्रकार परिषदेची सुरूवात केली नाही, तर 2 मीटर दुरूनच ट्रम्प यांचं अभिवादन स्वीकारलं आणि म्हटलं, ‘आजचा दिवस चांगला जावो… प्रिय शेजारी. तुम्ही व्यवस्थित असाल अशी मी आशा करतो.’ इतक्यावरच पुतिन थांबले नाहीत, तर त्यांनी अलास्काच्या इतिहासावर उजेड टाकत हा भाग कधीकाळी रशियाचाही होता, जो सध्या अमेरिकेचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. अलास्काचा हा भाग अमेरिका आणि रशियाला ऐतिहासिक तत्त्वांवर एकत्र जोडणारा दुवा असून, ही दोन्ही राष्ट्र एकमेकांचे स्पर्धक नसून, ती एकत्र येत भागिदारीनं चांगलं काम करु शकतात असं सूचक विधान पुतिन यांनी केलं.

भारतावर कसा होणार पुतिन- ट्रम्प भेटीचा परिणाम?

इथं दोन महासत्ता देशांचे राष्ट्राध्यक्ष भेटत असतानाच भारतासोबतच्या नात्यावर त्याचा नेमका कसा परिणाम दिसेल हाच प्रश्न जागतिक स्तराव अनेकांनी उपस्थित केला. साधारण तीन वर्षे मागं गेलं असता तेव्हापासूनच अमेरिकेसोबतचं नातं दृढ करण्यासाठी भारतानं मोठी गुंतवणूक केल्याचं स्पष्ट झालं. आशिया- पॅसिफीक क्षेत्रात चीनची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी अमेरिकेलाही भारताच्या आधाराची तितकीच गरज आहे. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, रशियाकडून तेल खरेदी सुरू असल्या कारणानं अमेरिकेनं भारतापासून दुरावा पत्करल्यास दोन्ही देशांमधील राजकीय नात्यात तणाव निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांच्या मते सध्या अमेरिकेनं भारतासंदर्भात घेतलेली भूमिका अतिशय वैयक्तिक स्वरुपातील असून, ट्रम्प सातत्यानं भारताला पाण्यात पाहत असल्याचं प्रतित होत आहे.

दरम्यान, प्रत्यक्षात पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील चर्चा आणि ही भेट या दोन्ही देशांसोबतचं भारताचं नातं भविष्यात कसं असेल हे ठरवू  शकत नाही. उलटपक्षी आत्मकेंद्री वृत्तीच्या ट्रम्प यांच्याच रणनितीमुळं येत्या दिवसात अमेरिका आणि भारताच्या नात्यावर भाष्य केलं जाईल.

ट्रम्प यांच्यासमोरच पुतिन यांच्याकडून पाश्चिमात्य देशांना सज्जड दम

ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये झालेल्या भेट आणि बैठकीदरम्यान युक्रेनसोबतच्या युद्धावर कोणतीही यशस्वी चर्चा झाली नसून, यामुळं जाणकारांना अजिबातच आश्चर्य वाटलेलं नाही. पुतिन आणि कोणाही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमध्ये 2018 नंतर झालेली ही पहिली बैठक असून, त्यादरम्यान पुतिन याची बोली सामंजस्याची असली तरीही त्यांचा आत्मविश्वास आणि भाषेचा लहेजा मात्र आधीप्रमाणंच कायम असल्याचं पाायला मिळालं. त्यांनी या भेटीतील चर्चांना अमेरिकेसह आर्थिक सहकार्यावर केंद्रीत करत युरोपीय देशांना अलास्का शिखर संवादपर बैठकीच्या सुरुवातीलाच प्रगतीच्या वाटेत अडथळा न होण्याचा सज्जड दम दिला!





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!