Homeदेश-विदेशआयएमडीच्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांमध्ये पावसाचा इशारा

आयएमडीच्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांमध्ये पावसाचा इशारा


आयएमडी जबरदस्त पावसाच्या मोठ्या प्रमाणावर इशारा: मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता हवामान विभागाकडून मोठा इशारा हा देण्यात आलाय. बुधवारी जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तसेत राज्यातील काही भागात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार आहे. या आठवड्यात बुधवार 13 ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा

14 ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात 13 आणि 14 ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज ॲलर्टही देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 13 ऑगस्टला अलर्ट जारी केला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

13 ऑगस्टला मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

देशातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळतंय. दरवर्षीपेक्षा यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर झाले आहे. राजस्थान, दिल्ली आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस होताना दिसतोय. उत्तर बिहारमधील सीतामढी, शिवहार, पूर्णिया आणि कटिहारपर्यंत एकूण 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबतच सीतामढी, शिवहर, दरभंगा, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज येथेही पाऊस झालाय.

बिहार, दिल्ली आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस

राजस्थानच्या अनेक जिल्हात जोरदार देखील  पाऊस होताना दिसतोय. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस म्हणावा तसा झाला नाही. आता परत एकदा भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस नसल्याने पिके संकटात आली असून बळीराजा चिंतेत असल्याचे बघायला मिळत आहे. काही भागांमध्ये अजूनही समाधानकारण पाऊस झाला नाहीये.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंडिगो फ्लाइटमध्ये मूल बेशुद्ध; सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग

0
सुरत6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E-7018 विमानामध्ये सोमवारी संध्याकाळी 3 वर्षांचा एक मुलगा बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती बिघडल्याने वैमानिकाने वैद्यकीय आणीबाणी...

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

0
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच...

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!