Homeदेश-विदेशवांतारास मराठीतील कोल्हापुर महादेवी हत्तीबद्दल वारंवार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली

वांतारास मराठीतील कोल्हापुर महादेवी हत्तीबद्दल वारंवार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली


Vantaras on mahadevi elephant : महादेवी हत्तीणीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना ‘वनतारा’नं काय उत्तरं दिली? पाहा…

1. महादेवी कोण आहे ? ( स्थानिक रित्या माधुरी म्हणून ओळखली जाणारी हत्तीण )

उत्तर – महादेवी ही 36 वर्षीय आशियाई हत्तीण असून तिने गेली 33-34 वर्षे कोल्हापूर, नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन बहत्तरक पट्टाचार्य जैन मठात काढली. तिला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गॅंगरीन होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली नखे या समस्या असून देखील तिला धार्मिक प्रथा-परंपरांचा भाग म्हणून गावातील मिरवणुकांमध्ये नेले जात असे. तिला ठेवलेल्या जागी जमिनीचा पृष्ठभाग धातुसदृश्य कडक असल्याने हे तिचे आजार आणखीनच वाढत गेले.

2. तिला वनतारामध्ये का नेण्यात आले ?

उत्तर – प्राणिमित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी या हत्तीणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली. या हत्तीणीवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी तिला नेऊन तिचे पुनर्वसन करावे, अशी शिफारस या समितीने एकमताने केली. 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ही शिफारस स्वीकारली आणि तिला जामनगर येथील राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट (वनतारा) मध्ये दोन आठवड्यात हलवण्याचा आदेश दिला.

3. सर्वोच्च न्यायालयात काय झाले ?

उत्तर – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले.
29 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्य पिठाने ही रिट याचिका  फेटाळून लावली आणि महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे, यावर भर देऊन तिचे वनतारामध्ये स्थलांतर करण्यावर शिक्कामोर्तब केले. या हत्तीणीची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणे, या गोष्टीही सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतल्या.

4. वनताराने या हत्तीची निवड केली ? की हा सर्व घटनाक्रम आपोआप घडलेला आहे ?

उत्तर – या सर्व कायदेशीर प्रक्रियेत वनतारा पक्षकार नव्हते. केवळ न्यायालयाच्या आदेशाने आम्हाला  ( वनताराला ) या हत्तीणीला येथे हलवून तिच्या पुनर्वसनाचा आदेश देण्यात आला. जेव्हा वन अधिकारी आणि वन्यजीव तज्ञ या हत्तीणीला वनतारामध्ये सुरक्षितरित्या सोडण्यासाठी आले तेव्हाच वनताराची भूमिका सुरू झाली. तेव्हापासून आम्ही हेच सर्वांना पटवून देत आहोत की महादेवीला वनतारामध्ये हलवण्याचा निर्णय हा न्यायालयाचा होता आणि हा निर्णय वनतारामुळे घेण्यात आला नाही.

5. वनतारामध्ये प्राण्यांसाठी कोणकोणत्या सोयी आहेत आणि वनताराचे संचालन कोण करते ?

उत्तर – वनतारा हे गुजरातच्या जामनगर मध्ये साडेतीन हजार एकरांवर पसरलेले वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र आहे. याच्यात २,००० प्रजातींचे दीड लाख प्राणी आहेत. वनतारामध्ये पशुसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांचा दर्जा पाहून ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने वनताराला प्राणिमित्र राष्ट्रीय पुरस्कार (कंपनी गट ) दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे वनतरा हे पर्यटन प्राणी संग्रहालय नाही. येथे पर्यटकांना किंवा पाहुण्यांना प्रवेश नाही. त्यायोगे येथील प्राण्यांना कमीत कमी त्रास होईल तसेच त्यांना जास्तीत जास्त एकांत मिळेल याची काळजी घेतली जाते.

6. वनतारामध्ये आता महादेवीची सध्याची स्थिती काय आहे ?

उत्तर – महादेवी वनतारा मध्ये 30 जुलै 2025 मध्ये आल्यापासून तिला विशेष पशुवैद्यक उपचारांखाली ठेवण्यात आले आहे. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.

– तिच्या सांधेदुखीवर इलाज म्हणून रोज जल उपचार तळे.
– एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड आदी रेडिओलॉजिकल रोगनिदान.
– नियमित फिजिओथेरपी उपचार आणि संतुलित खाणेपिणे.
– साखळदंडविरहित मऊ पृष्ठभागाची राहण्याची व्यवस्था आणि अन्य हत्तींबरोबर एकत्र येण्याची संधी.

या सर्व उपायांमुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचे चलनवलन सुधारत असल्याचे लगेच दिसून आले आहे. महादेवी ही शांत असून ती आपल्या भावना चांगल्या तऱ्हेने व्यक्त करीत आहे. तसेच अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते आहे.

7. महादेवीला कोल्हापूरला परत नेण्याची परवानगी मिळाली आहे का ?

उत्तर – महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताराने दिले आहेत. मात्र त्यासाठी खालील बाबींची पूर्तता आवश्यक आहे.
– त्यासाठी आवश्यक अशा अधिकृत वन्यजीव खात्याने तसेच जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे.
– सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांच्या वाहतुकीचे सर्व नियमांचे पालन करण्यात आले पाहिजे.
– जर आणि जेव्हा न्यायालयाने तसा आदेश दिला तर या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीत सुरक्षितरित्या आणि प्रतिष्ठेने पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराची तयारी आहे.

9. या प्रकरणात वनताराची प्राथमिक भूमिका काय होती ?

– उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्यानुसार या हत्तीणीचे हित जोपासणे हे प्रमुख उद्दिष्ट
– कायदेशीर उत्तरदायित्व, जबाबदारी आणि पारदर्शकता यांचे पालन करणे. यात तिच्या प्रकृतीचे संपूर्ण वैद्यकीय अहवाल आणि तटस्थ निरीक्षकांचे पाहणी अहवाल यांचा समावेश आहे.
– या प्रकरणात समाजाच्या भावनांचाही विचार करणे म्हणजेच महादेवी ची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांचा विचार करता धार्मिक प्रथांमध्ये प्रत्यक्ष हत्तीला नेऊ नये तर त्याऐवजी हत्तीची यांत्रिक प्रतिमा वापरली जावी.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!