Homeदेश-विदेशगुजरातमध्ये व्यापक टीकेनंतर महिलांच्या सुरक्षिततेवर विवादास्पद पोस्टर्स

गुजरातमध्ये व्यापक टीकेनंतर महिलांच्या सुरक्षिततेवर विवादास्पद पोस्टर्स


अहमदाबादमधील गुजरात विवादास्पद पोस्टर्सः बलात्कार होण्यापासून स्वतःला वाचवायचे असेल तर घरीच थांबा, या आशयाचे पोस्टर्स गुजरातमध्ये झळकले आहेत. अहमदाबाद शहरात लागलेले हे पोस्टपासून स्थानिकांना मोठा धक्का बसला असून या पोस्टर्सवरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात पोस्टर्स लावले आहेत. मात्र, यापैकी काही पोस्टर्सवरील मजकूर वादात सापडला आहे. या पोस्टर्सच्या माध्यमातून बलात्कार टाळायचा असेल तर घरी थांबवण्याचा सल्ला महिलांना दिल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

वादग्रस्त पोस्टर्समध्ये काय?

वाहतूक पोलिसांनी शहरातील काही भागांमध्ये जनजागृतीसंदर्भातील पोस्टर्स लावली आहेत. रात्री उशिरा पार्टीला जाऊ नका. तुमच्यासोबत बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो. आपल्या मित्रांसोबत अंधारात किंवा निर्जनस्थळी जाऊ नका. तिथे तुमच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झाला तर? असा मजकूर लिहिलेली पोस्टर्स शहरातील चांदलोडिया क्षेत्रातील रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आलेली.

पोलिसांनी या प्रकरणाबद्दल काय म्हटलं?

या पोस्टर्सवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरल्यानंतर वाहतूक विभागाविरोधात टीकेची झोड उठली त्यानंतर ही पोस्टर्स काढण्यात आली आहेत. मात्र हे प्रकरण शेकणार अशी दाट शक्यता निर्माण झाल्याने आता वाहतूक विभागाने या पोस्टर्सची जबाबदारी नाकारली आहे. वाहतूक पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एकही पोस्टर्स लावले नाही. पोलिसांनी लावलेली पोस्टर्स केवळ वाहतूक सुरक्षेसंदर्भात असल्याचा दावा पोलिस उपायुक्त (पश्चिम वाहतूक) नीता देसाई यांनी केला आहे. ‘सतर्कता ग्रुप’ नामक एका स्वयंसेवी संस्थेने वाहतूक पोलिसांच्या संमतीशिवाय ही वादग्रस्त पोस्टर्स लावली असल्याचा दावा देसाई यांनी केला आहे.

राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

सदर पोस्टर्स प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. “राज्यात रोज पाचपेक्षा जास्त बलात्कार होत आहेत. या पोस्टर्समधून राज्यात महिला सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होते. गुजरातमधील महिलांनी रात्री घराबाहेर पडू नये का?” असा सवाल ‘आप’ने विचारले आहे.

सोशल मीडियावरुनही या पोस्टर्ससंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संदेश देण्याचा, सुरक्षेचा संदेश देण्याची ही कोणती असंवेदनशील पद्धत आहे? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकरणावरुन पोलीस खात्याने जबाबदारी झटकली असतानाच हे पोस्टर्स लावले तरी कोणी असा सवाल उपस्थित केला जातोय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

फेसबूकवरून वन्यजीव तस्करी?:अहवालात दावा- फेसबूक बनले अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ऑनलाइन बाजार

0
जगभरात वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक गैर-सरकारी संस्थांच्या (NGO) एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, फेसबूक अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ज्ञात...

पश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे...

0
मराठी बातम्याव्यवसायपश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे विकली गेलीनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात एप्रिल-जून तिमाहीत...

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ:मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ उपक्रम; नेमका उपक्रम काय?

0
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात...
spot_img

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

पश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे...

0
मराठी बातम्याव्यवसायपश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे विकली गेलीनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात एप्रिल-जून तिमाहीत...

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...
error: Content is protected !!