इंडिगो फ्लाइट राडा: इंडिगोच्या विमानात एका मुस्लिम प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरतोय. ज्यामध्ये एका व्यक्तीने मुस्लिम प्रवाशाच्या चेहऱ्यावर थप्पड मारल्याचे स्पष्ट दिसतंय. ही घटना विमान उड्डाणाच्या वेळी घडल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणाने प्रवाशांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय आहे नेमकी घटना?
व्हायरल व्हिडिओनुसार, विमानातील केबिन क्रू एका मुस्लिम प्रवाशाला त्याच्या जागेवर बसवण्यासाठी त्याचा हात धरून नेत होते. याचवेळी अचानक एका व्यक्तीने त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर जोरदार थप्पड मारली. या घटनेने विमानात एकच गोंधळ उडाला. केबिन क्रूने तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. क्रू मेंबर्स सतत, “कृपया त्याला मारू नका… शांत राहा,” असे सांगत होते. असे असले तरी फ्लाइटमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण कायम राहिले. व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, “तू त्याला का मारले?” असे मारहाण करणाऱ्याला दुसऱ्या प्रवाशाने विचारले. यावर त्यच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. मारहाण झालेल्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर दुखः आणि भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते. मारहाण झालेल्या व्यक्तीला केबिन क्रूने पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला.
समाज पूर्णपणे कुजलेला आहे pic.twitter.com/l03axtiqsc
– आदिल सेडडिकी (अझमी) (@adilseddiqui7) 1 ऑगस्ट, 2025
सोशल मीडियावर संताप
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी या घटनेला धार्मिक भेदभाव आणि द्वेषपूर्ण कृती असं म्हटलंय. “अशा घटना समाजात तेढ निर्माण करतात,” असे एका युजरने लिहिले. दुसरीकडे, काहींनी इंडिगोच्या केबिन क्रूचे कौतुक केले, ज्यांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखली.
इंडिगोकडून काय प्रतिक्रिया?
आमच्या एका उड्डाणांपैकी एकावर शारिरीक भांडण असलेल्या घटनेची आम्हाला माहिती आहे. अशी अनियंत्रित वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आम्ही आमच्या प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षिततेची आणि सन्मानाची तडजोड करणार्या कोणत्याही क्रियांचा जोरदार निषेध करतो.
आमच्या क्रूने… नुसार कार्य केले…
– इंडिगो (@इंडिगो 6) 1 ऑगस्ट, 2025
इंडिगो एअरलाइन्सकडून या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले आहे.
विमान कंपन्यांनी पावले उचलण्याची गरज?
ही घटना समाजात धार्मिक तणाव वाढवणारी ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी विमान कंपन्यांनी अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर इंडिगो आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
































