Homeदेश-विदेशमाजी पंचायत अध्यक्ष लोकेशची आत्महत्या नाही तर हत्या; बाटलीच्या झाकणाने उघड केलं...

माजी पंचायत अध्यक्ष लोकेशची आत्महत्या नाही तर हत्या; बाटलीच्या झाकणाने उघड केलं सत्य, घरातच लपला होता आरोपी


लोकेश खून प्रकरण बेंगळुरू: बंगळुरु दक्षिण जिल्ह्यातील एम.के. दोड्डी गावातील माजी पंचायत अध्यक्ष लोकेश यांच्या मृत्यूमागील रहस्य उलगडलं आहे. कर्जबारीपणामुळे आत्महत्या केल्याचा बनाव बनावण्यात आला होता. प्रथमदर्शनी पोलिसांनाही तेच वाटलं होतं. पण सखोल चौकशीनंतर एक महिन्यानंतर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. लोकेश यांनी आत्महत्या केली नव्हती तर त्यांची हत्याचा झाल्याच समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या हत्येचा कट घरातील सदस्यानेच रचला होता. (bengaluru former panchayat president murder wife lover four hired killers Crime News in marathi)

आत्महत्येचा बनाव

लोकेश यांचा मृतदेह 23 जून 2025 ला कनवा धरणाजवळ त्यांच्या कारशेजारी आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला घटनास्थळाची पाहणी केल्यावर अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. पण दुसऱ्या दिवशी मकाळी गावातील पंचायत सदस्या आणि लोकेश यांची पत्नी चंद्रलेखा या मीडियासमोर आल्यात. त्यांनी अश्रू ढाळत पतीला कर्जबारीपणामुळे नैराश्य आलं होतं. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला.

माजी पंचायत अध्यक्ष लोकेशची हत्येचा उलगडा कसा झाला?

पोलिसांना तपास असं दिसून आलं की, मृतदेहाजवळ विषाच्या बाटलीला झाकण नव्हतं. त्याशिवाय लोकेशच्या फक्त एका पायात चप्पल होती. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पण दुसरीकडे पोस्टमार्टममध्ये शरीरात विष असल्याचं निष्पन्न झालं. त्यात असंही अंदाज लावण्यात आलं की ते जबरदस्तीने दिलं गेलं असावं.

पण पोलिसांचा हा संशय अजून बळावला तो त्या सीसीटीव्ही फूटजे हाती लागल्यावर. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक काळी कार लोकेश यांच्या पाठलाग करताना दिसून आली. पुढे तपासात योगेश नावाच्या तरुणाचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळाले. त्यामुळे पोलिसांचा संशयाला अधिक बळ मिळालं. पोलिसांनी योगेशची माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यानंतर एक एक धक्कादायक खुलासा झाला.

दुसरीकडे लोकेशचे वडील मोटेगौडा यांनी चंद्रकला यांच्या हत्येमागे असल्याचा आरोप करत पोलीस तक्रार दाखल केली तेव्हा परिस्थिती नाट्यमय वळण घेत गेली. मोटेगौडा यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांची सून बंगळुरूमध्ये राहत होती तर त्यांचा मुलगा आठवड्यातून एक-दोनदा तिला भेटायला येत असे. त्यांनी असेही सांगितलं की या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक नव्हतं. चंद्रकलाचे मंड्या येथील नवीले गावातील रहिवासी योगिशसोबत प्रेमसंबंध होते आणि लोकेशला ते कळलं होतं.

लोकेशची हत्या कोणी केली?

मोटेगौडा यांच्या म्हणण्यानुसार, दोड्डाबल्लापुरा जवळील कन्ना होसाहल्ली येथे एक जागा विकल्यानंतर चंद्रकला यांनी तिच्या पतीशी भांडण केले होते आणि त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती. दुसरीकडे योगेशला अटक करण्यात आली. चौकशी केल्यानंतर योगेश पोलिसांसमोर सगळं सत्य सांगितलं. योगेशने पोलिसांना सांगितलं की, चंद्रलेखाच्या सांगण्यावरून त्याने गुन्हेगारी टोळीला सुपारी दिली होती. आरोपी शिवलिंगा, सूर्या आणि चंदन यांनी 23 जून रोजी लोकेशचा पाठलाग करून, कनवा धरणाजवळ जबरदस्तीने त्याला विष दिलं. त्यानंतर आत्महत्या केल्याचा बनाव करून कार रस्त्याच्या कडेला उभी केली. लोकेशची हत्या त्याची पत्नी आणि प्रियकर यांनी केली होती. पोलिसांनी चंद्रलेखा, तिचा प्रियकर योगेश आणि सुपारी घेणाऱ्या तिन्ही आरोपींना गजाआड केलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्विशा प्रकरणातील आरोपी निवृत्त न्यायाधीश गिरिबाला यांच्या घरी चोरी:दागिने आणि कागदपत्रांची फाइल उचलली, पोलिसांचा...

0
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरात चोर शिरले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह गिरिबाला आणि त्यांचे पुत्र समर्थ...

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून...

0
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे,...

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!