बेबी ग्रोक: प्रसिद्ध उद्योजक, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती एलॉन मस्क सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत टेस्ला, स्पेसएक्स, न्यूरालिंक, द बोरिंग कंपनी आणि xAI यासारख्या कंपन्यांची स्थापना केलीय. तेथे ते संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. मस्क यांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांच्या क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवलेयत. मानवाला अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि शाश्वत ऊर्जा यासारख्या क्षेत्रांत पुढे नेणे हे मस्क यांचे उद्दीष्ट आहे. ग्रोकचा फायदा जगभरात घेतला जातोय. कंटेट तयार करण्यापासून फोटो, व्हिडीओ एडीट, तयार केला जातो.
एलॉन मस्क यांनी आता एका नव्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यांनी ‘बेबी ग्रोक’ नावाच्या मुलांसाठी सुरक्षित आणि योग्य AI चॅटबॉटच्या लॉन्चिंगची घोषणा केलीय. ग्रोकच्या सध्याच्या AI चॅटबोटवर सोशल मीडियावर तीव्र टीका होत असताना ही घोषणा करण्यात आली आहे.‘बेबी ग्रोक’बाबत मस्क यांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. पण हे चॅटबॉट मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित असेल, असे सांगण्यात येतंय.
या चॅटबोटमध्ये अश्लील भाषा किंवा आक्षेपार्ह विषयांना स्थान नसेल, अशी माहिती समोर येतेय. ग्रोकच्या यापूर्वीच्या प्रौढांसाठीच्या चॅटबोटमुळे वाद निर्माण झाला होता. यामुळे अश्लील कंटेटलाही प्रोत्साहन दिले जात असल्याचा ठपका ग्रोकवर ठेवण्यात आलाय. त्यामुळे अश्लील कंटेटवर नियंत्रण मिळवण्यालाठी एलॉन मस्क यांचा एक प्रयत्न मानला जातोय.
आम्ही बेबी ग्रोक बनवणार आहोत @xaiकिड-अनुकूल सामग्रीसाठी समर्पित एक अॅप
– एलोन मस्क (@एलोनमस्क) 20 जुलै, 2025
सध्याचे वादग्रस्त चॅटबोट
ग्रोकचे सध्याचे AI चॅटबोट बेफामपणा आणि वादामुळे चर्चेत आहे. यातील एनी (Ani) ही एक अॅनिमे-शैलीची महिला चॅटबॉट आहे, जी गॉथिक कॉर्सेट परिधान करते आणि संभाषणात फ्लर्टिंग करते. अहवालानुसार जसजसे यूजर्स तिच्याशी जास्त संवाद साधतात. ती व्हर्च्युअल लिंजरीसारख्या रूपात दिसू लागते. दुसरीकडे रुडी (Rudi) चॅटबोट रेड पांडाच्या रूपात डिझाइन केलेला चॅटबोट आहे. रुडी दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये विभागलाय. एकीकडे तो विनोदी आणि गोंडस आहे. तर दुसरीकडे तो शिवीगाळ करणारा आणि रागीट आहे.व्हॅलेंटाइन (Valentine) हा चॅटबोट हा ख्रिश्चन ग्रे आणि एडवर्ड कुलन यांसारख्या काल्पनिक पण वादग्रस्त पुरुष पात्रांपासून प्रेरित आहे. याचा अंदाज भावनिक नियंत्रण आणि विषारी नातेसंबंधांना आकर्षक बनवतो.























