Homeदेश-विदेशकोल्डप्ले किस कॅम खगोलशास्त्रज्ञ मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी बायर्न यांनी बोस्टनमधील हॉलिवूड...

कोल्डप्ले किस कॅम खगोलशास्त्रज्ञ मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी बायर्न यांनी बोस्टनमधील हॉलिवूड रॉक बँड कोल्डप्ले मैफिलीवर गोळीबार केला


कोल्डप्ले किस कॅम: बोस्टनमधील हॉलीवूड रॉक बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे. Coldplay Kiss cam मुळे 11000000000000 रुपयांची कंपनी चर्चेत आली आहे. या शो मध्ये LIVE रोमान्स करणाऱ्या CEO विरोधात कंपनीने मोठी कारवाई केली आहे.  बोस्टनमधील हॉलीवूड रॉक बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ही चर्चा एका ‘किस कॅम’ व्हिडीओची आहे. या कॉन्सर्टमधील व्हायरल होणारा व्हिडीओ सॉफ्टवेअर कंपनी अ‍ॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न आणि एचआर कंपनीच्या एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट यांचा आहे.

दरम्यान, या कोल्डप्ले कॉन्सर्टमुळे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्याच कंपनीच्या एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट यांचं अफेअर उघडकीस आलं आहे. या व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांना मिठी मारून रोमान्स करताना दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीईओ अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबोट यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सीईओ अँडी बायरन यांना रजेवर पाठवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

या टेक कंपनीने शुक्रवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये नेतृत्व बदलाची पुष्टी केली. ‘अँडी बायरन यांना रजेवर पाठवण्यात आल्यामुळे सहसंस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट डीजॉय सध्या अंतरिम सीईओ म्हणून काम करत आहेत. त्यानंतर एक फॉलो-अप विधान देखील आलं देण्यात आलं आहे. आम्ही येत्या काही दिवसांत योग्यतेनुसार अधिक तपशील शेअर करू’, अशी माहिती एक्समधील पोस्टमधून देण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिनने कॉन्सर्टदरम्यान किस कॅमचा वापर केला आहे. याच किस कॅमच्या मदतीने कॅमेऱ्यानं एका जोडप्याला स्पॉट केलं आणि एका मोठ्या पडद्यावर त्यांचा रोमँटिक परफॉर्मन्स दाखवण्यात आला. यावेळी दोघेही अगदी कोझी वातावरणात परफॉर्मन्सचा आनंद घेत होते. पण, स्पॉटलाइट आणि किस कॅमचा फोकस त्यांच्यावर रोखला गेला, हे जेव्हा दोघांनी पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

दोघेही लगेच चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागले. नेमकं घडलं तरी काय ते कोणाला काहीच समजत नव्हते. पण, हा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण- कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये रोमँटिक परफॉर्म करणारी दोघं साधीसुधी माणसं नव्हती, तर अ‍ॅस्ट्रोनॉमर या प्रसिद्ध कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि कंपनीची एचआर हेड क्रिस्टीन कॅबॉट हे दोघे होते. व्हिडीओत पुढे कॅमेरा फोकसमध्ये येताच एचआर हेड क्रिस्टीन कॅबॉट मिठीतून दूर होत मागे वळून लाजेनं लगेच तिचा चेहरा लपवते. तर, सीईओ अँडी बायरन कॅमेऱ्यापासून दूर होत खाली बसताना दिसत आहेत.

या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसतेय. अनेक सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सीईओ अँडी बायरन हे विवाहित आहेत. मेगन केरिगन बायरन असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. त्यांना दोन मुलं आहेत; पण या व्हिडीओमुळे त्यांचे एचआर हेडबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप होत आहेत.
अ‍ॅस्ट्रोनॉमर कंपनी अ‍ॅस्ट्रोसाठी ओळखली जाते. ही कंपनी अपाचे एअरफ्लो वापरून डेटा वर्कफ्लो व्यवस्थापित करते. ही कंपनी इतर कंपन्यांना त्यांचा डेटा व्यवस्थापित करण्यास मदत करते. 11 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली ही कंपनी सीईओच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान, संसदेला संबोधित केले:म्हणाले- सेशेल्ससोबत आमचे 256 वर्षांचे जुने नाते, 5...

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी सेशेल्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'गार्डियन ऑफ ब्लू होरायझन'ने सन्मानित करण्यात आले. यासह मोदींना आतापर्यंत 34 देशांचे सर्वोच्च नागरी...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
spot_img

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...

पोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती

0
मराठी बातम्याखेळपोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत...
error: Content is protected !!