Homeदेश-विदेशकरण देव हत्येच्या प्रकरणात बायकोचे बंधूचे प्रेमसंबंध आहे की या दोघांनीही तिचा...

करण देव हत्येच्या प्रकरणात बायकोचे बंधूचे प्रेमसंबंध आहे की या दोघांनीही तिचा नवरा इन्स्टाग्राम गप्पा मारल्या


दिल्ली करण देव खून प्रकरण: राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. येथील उत्तम नगरमध्ये 36 वर्षीय व्यक्तीचा रहस्यमय परिस्थितीमध्ये मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचं अनेकांना वाटलं. वीजेचा झटका लागून ही व्यक्ती मरण पावल्याचं सांगण्यात आलं. मात्र आता या प्रकरणामध्ये नवीन हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. या व्यक्तीच्या पत्नीनेच पतीच्या चुलत भावाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांमधून पतीला संपवल्याचं समोर आलं आहे. दोन्ही आरोपींमधील इन्स्टाग्राम चॅटमधून हा खुलासा झाला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

विजेचा झटका लागल्याने मृत्यू झाल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी सकाळी दिल्लीतील जनकपुरीमधील एका रूग्णालयात विजेचा झटका लागल्याने करण देव याला दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. पत्नी सुष्मितानेही पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये घरात विजेचा झटका बसल्याने नवरा बेशुद्ध पडल्याचं सांगितलं. कुटुंबाने हा मृत्यू अपघाताने झाला असल्याचे मानून शवविच्छेदन करण्यास नकार दिला. पीडित व्यक्तीचे वय कमी असल्याने आणि त्याच्या मृत्यूसंबंधित परिस्थिती पाहता पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा आग्रह धरला. हरिनगर इथल्या दीनदयाळ उपाध्याय रूग्णालयात मृतदेह शविविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मोबाईलमध्ये सापडला धक्कादायक पुरावा

परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान मयत व्यक्तीची पत्नीचा मोबाईल तपासण्यात आला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. इन्स्टाग्रामवरुन सुष्मिताने मयत करण देवचा धाकटा भाऊ कुणाल देवला मेसेज केल्याचं आढळून आलं. यामध्ये करणला कसं संपवता येईल याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचं दिसून आलं. कुणालने बिंग फुटल्यानंतर 16 जुलै रोजी स्वत: पोलिसांकडे हे इन्स्टाग्राम चॅटचे स्क्रीनशॉट सादर केले.

इन्स्टाग्राम चॅटमध्ये काय?

12 जुलैच्या रात्री सुष्मिताने करणच्या जेवणामध्ये झोपेच्या 15 गोळ्या टाकल्याचं या इन्स्टाग्राम चॅटमधून समोर आलं आहे. या गोळ्यांमुळे करणला तातडीने काहीही झालं नाही. त्यामुळे सुष्मिता आता आपण पकडले जाणार असा विचार करुन घाबरली. तिने राहुलला मेसेज केला. “औषध घेतल्यानंतर मृत्यू होण्यास किती वेळ लागतो ते एकदा बघ. त्याने जेवण करुन तीन तास झाले. त्या उलट्या झाल्या नाही, काही त्रासही झाला नाही आणि अजून त्याचा मृत्यूही नाही. मग आपण काय करायचे? काहीतरी सुचव,” असं सुष्मिताने मेसेजमध्ये म्हटलं होतं.

काही खलत नसेल तर त्याला शॉक दे

सुष्मिताच्या या मेसेजवर समोरुन राहुलने, “जर तुला काही कळत नसेल तर त्याला शॉक दे,” असं उत्तर दिलं. त्यावर सुष्मिताने, “शॉक देण्यासाठी त्याला कसं बांधू?” असा प्रश्न विचारला. यावर राहुलने, “टेपने बांध” असं उत्तर दिलं. या मेसेजनंतर सुष्मिताने, “त्याच्या श्वासांची गती मंदावली आहे,” असा मेसेज राहुलला केला. “तुझ्याकडे असलेली सगळी औषधं त्याला दे,” असा सल्ला राहुलने समोरुन दिली. यानंतर सुष्मिताने राहुलला मेसेज करुन, “मला त्याचं तोंड उघडता येत नाहीये. मी त्याच्या तोंडात पाणी ओतू शकते पण त्याला औषध देता येत नाहीये. तू इथे ये. कदाचित आपण मिळून त्याला गोळ्या चारु शकतो,” असं सांगितलं.

..अन् दोघांनी त्याला शॉक दिला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी करणला शांत झाल्यानंतर विजेचा झटका देऊन त्याला मारलं. या दोघांनी अपघाताने करणचा मृत्यू झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्यांमुळे करण लगेच बेशुद्ध झाला नाही. तेव्हा सुष्मिता आणि राहुलने करणला झोपेच्या गोळ्यांमुळे गुंगी आल्याने तो शांत झाला. करण जिवंत असतानाच या दोघांनी त्याच्या बोटाला वीजेचा शॉक देण्याचा निर्णय घेतला.

करणचा मृत्यू झाल्यानंतर…

करणचा मृत्यू झाल्यानंतर सुष्मिता जवळच तिच्या सासरच्या घरी गेली आणि त्यांना सांगितले की करणला विजेचा झटका लागला. कुटुंबीयांनी तातडीने घरात जाऊन त्याला रूग्णालयात नेले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर करणच्या चुलत भावाने त्याच्या शवविच्छेदनाला तीव्र विरोध केला. मात्र विरोध असूनही नियम आणि तरुणपणी अनैसर्गिक मृत्यूबाबतच्या संशयामुळे पोलिसांनी शवविच्छेदन प्रक्रिया करण्यास सांगितले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!