Homeदेश-विदेशस्ट्रीट कुत्र्यांवरील याचिकेवर त्यांना आपल्या घरातील सर्वोच्च न्यायालयात खायला द्या

स्ट्रीट कुत्र्यांवरील याचिकेवर त्यांना आपल्या घरातील सर्वोच्च न्यायालयात खायला द्या


स्ट्रीट कुत्र्यांवरील सर्वोच्च न्यायालय: उघड्यावर भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासंदर्भातील विषयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशाप्रकारे उघड्यावर कुत्र्यांना खायला घालण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील सोसायटीमध्ये कुत्र्यांना खायला घालण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही तुमच्या घरात एक निवारा गृह उघडावे आणि तिथे कुत्र्यांना खायला द्यावे,’ असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

कोणासमोर झाली ही सुनावणी?

न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने प्राणीप्रेमींबद्दल बोलताना, “या मोठ्या मनाच्या लोकांसाठी प्रत्येक गल्ली, प्रत्येक रस्ता का खुला करू नये! जिथे फक्त प्राण्यांनाच परवानगी असेल, तिथे माणसांसाठी जागा राहणार नाही,” असं उपाहासात्मक विधान केलं. पुढे प्राणीप्रेमींना सवाल करताना सर्वोेच्च न्यायालयाने, “तुम्ही तुमच्या घरात या कुत्र्यांना का खायला घालत नाही? हे करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखत नाहीये,” असं म्हटलं.

याचिकाकर्त्याचं म्हणणं काय?

या प्रकरणात, याचिकाकर्त्याने म्हटले आहे की कुत्र्यांना खायला घालताना तिला त्रास होत होता. समाजातील प्राण्यांच्या जन्म नियंत्रण नियमांनुसार, कुत्र्यांना खायला घालण्यासाठी एक निश्चित जागा असावी. खरं तर, प्राणी जन्म नियंत्रण नियमांचा नियम क्रमांक 20 हा भटक्या कुत्र्यांना खायला देण्याशी संबंधित आहे. त्यात असे म्हटले आहे की, त्यांच्या परिसरात राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांना जेवण देण्याची आवश्यक व्यवस्था करणे ही रहिवासी कल्याण संघटना, अपार्टमेंट मालक संघटना किंवा स्थानिक संस्थेच्या प्रतिनिधींची जबाबदारी आहे.

वकीलाने काय म्हटलं?

वकीलाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की ही व्यवस्था ग्रेटर नोएडामध्ये नगरपालिकेने केली आहे परंतु नोएडामध्ये नाही. ज्या ठिकाणी लोक वारंवार भेट देत नाहीत अशा ठिकाणीही अन्न पुरवण्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते.

सकाळी घराबाहेर पडल्यानंतर…

वकीलाचं विधान ऐकून खंडपीठाने, “तुम्ही सकाळी सायकलिंगसाठी बाहेर जा. तुम्हाला काय दिसते ते पहा. भटक्या कुत्र्यांमुळे केवळ सकाळी फिरायला जाणाऱ्यांनाच नाही तर सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांनाही धोका आहे,” असं म्हटलं. तथापि, न्यायालयाने ही याचिका आधीच प्रलंबित याचिकेसह एकत्रित केली आहे.

देशभरात भटक्या कुत्र्यांचा त्रास

भटकी कुत्री आणि त्यांचे लाड करणारे प्राणीमित्र हे कायमच चर्चेचा विषय ठरतात. भटक्या कुत्र्यांकडून केले जाणारे हल्ले, रात्री अपरात्री प्रवास करताना या कुत्र्यांमुळे जीव धोक्यात धरुन करावा लागणारा प्रवास अशा अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या चिंतेत भर घालत असताना नव्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमकेबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तिसऱ्या पत्नीच्या मनधरणीसाठी टॉवरवर चढला युवक:गार्ड रील बघत राहिले, तुरुंगातून बलात्कारी पळाला; मांजरीला अमर...

0
मध्य प्रदेशात दोन पत्नी असतानाही तिसऱ्या पत्नीला मनवण्यासाठी एक व्यक्ती टॉवरवर चढला. तर, बरेलीच्या सेंट्रल जेलमध्ये गार्ड रील पाहण्यात व्यस्त असताना बलात्काराचा आरोपी...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांचे जुने वाद मिटतील, मकर राशीच्या लोकांना पदोन्नती...

0
शनिवार, २७ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण होऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांचे जुने वाद...

मेस्सी आणि रोनाल्डो समोरासमोर; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात:यवतमाळातून आज विदर्भ दौऱ्याची सुरुवात; बंडखोरांना काय उत्तर देणार? राज्याचे...

0
ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरेंच्या तोफ धडाडणार असून, त्यांच्या...
spot_img

मेस्सी आणि रोनाल्डो समोरासमोर; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...
error: Content is protected !!