Homeदेश-विदेशइलेक्ट्रिक बस हायपरलूप रोपवे नितीन गडकरी यांनी भारतीय परिवहन पायाभूत सुविधांच्या महत्वाकांक्षी...

इलेक्ट्रिक बस हायपरलूप रोपवे नितीन गडकरी यांनी भारतीय परिवहन पायाभूत सुविधांच्या महत्वाकांक्षी योजनेचे अनावरण केले

नितीन गडकरी मेगा मोबिलिटी योजना: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय वाहतुकीची रुपरेषा बदलण्यासाठी एक प्रकल्प सादर केला आहे. या योजनेत टिकाऊ आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेले वाहतूक व्यवस्थेवर जोर दिला आहे. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत गडकरींना अनेक योजनांबद्दल माहिती दिली आहे. यात शहरातील इलेक्ट्रिक रॅपिड मास ट्रांन्झिस्ट, हायपरलूप कॉरिडोर आणि रोपवे व केबल कार सिस्टमचा समावेश आहे.

गडकरींनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही नाविन्याला चालना देत आहोत. मास मोबिलिटीमध्ये एक क्रांती येणार आहे. भारताच्या पायाभूत सुविधांच्या भविष्याला आकार देण्यासाठी तंत्रज्ञान, उपलब्धता आणि पर्यावरणीय जबाबदारीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मास मोबिलीटीचा अर्थ मोठ्या प्रमाणात वाहतूक म्हणजे लोकांना एकत्र प्रवास करण्यासाठी चांगले साधन प्रदान करणे.

राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर दररोज 100 किमी महामार्ग बांधण्याचे आणि 25,000 किमी दुपदरी रस्त्यांचे चार पदरीमध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, 2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी 91,287 किमी होती, जी आता1,46,204 किमीपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे, 2014 मध्ये हाय-स्पीड कॉरिडॉर 93 किमी होते, जे आता 2,474  किमी पर्यंत वाढले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे रस्त्यांचे निरीक्षण केले जाईल. महामार्गालगत 20-25 कोटी झाडे लावण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. पर्यावरण मंत्रालय ‘ट्री बँक’ योजनेचा विचार करत आहे.

दिल्ली आणि बेंगळुरूसारख्या शहरांसाठी मेट्रोनियो पॉड टॅक्सी, हायपरलूप ट्रान्सपोर्ट आणि एलिव्हेटेड पिलर-आधारित नेटवर्कसारखे पायलट प्रकल्प तयार केले जात आहेत, असं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसंच, तो दिवस दूर नाही जेव्हा शहरांमध्ये केबल-रन बसेस आणि विमानासारख्या सुविधांसह इलेक्ट्रिक रॅपिड मास ट्रान्सपोर्ट असेल. डोंगराळ आणि दुर्गम भागात 360 रोपवे आणि फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी 60 वर काम सुरू आहे. यामध्ये केदारनाथ सारख्या तीर्थस्थळांचाही समावेश आहे. या प्रणालींचा उद्देश डोंगराळ भागातील प्रदेशात सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक प्रदान करणे आहे. फ्युनिक्युलर रेल्वे ही एक प्रकारची ट्रेन आहे जी उतारावर धावते.

नागपुरात 135 आसनी इलेक्ट्रिक बसेससाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. या बसेस ताशी 120-125 किमी वेगाने धावू शकतात. यामध्ये प्रीमियम सीटिंग आणि एअर कंडिशनिंग सारख्या सुविधा असतील. या बसेस 30-40 मिनिटांत चार्ज होतील. दिल्ली-जयपूर आणि मुंबई-पुणे सारख्या आंतरशहर मार्गांवर धावण्यापूर्वी त्यांची चाचणी घेतली जाईल, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...

0
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...

ब्रिटिश प्रभावशाली ब्रूक जॉर्ज आरोपी; फेसबुक कनेक्शन

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादुबईत 23 वर्षीय ब्रिटिश सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ब्रूक जॉर्जवर एका ब्रिटिश नागरिकाच्या हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. मृतकाशी तिची ओळख...

ग्रीन होम 4% पर्यंत महाग, वीज-पाण्यावर 30% पर्यंत बचत:घर खरेदी करताना टिकाऊपणा नवीन निकष...

0
घर खरेदी करण्याचे निकष आता फक्त स्थान, किंमत आणि सुविधा नाहीत, तर टिकाऊपणा (सस्टेनेबिलिटी) देखील आहे. प्रॉपटेक फर्म स्क्वेअर यार्ड्सच्या एका अहवालानुसार, ग्रीन...
spot_img

ग्रे-डिवोर्स; अमेरिकेत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 40% घटस्फोट:कारण- नात्यांपेक्षा अस्तित्वाला जास्त महत्त्व देत...

0
30 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र राहिल्यानंतर ऍलन हिकेनबॉटम आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सुरुवातीला दोघांमध्ये पुस्तके आणि कलेबद्दल खूप ओढ होती. दोघांनी मिळून...

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन...

0
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून...

ग्रीन होम 4% पर्यंत महाग, वीज-पाण्यावर 30% पर्यंत बचत:घर खरेदी करताना टिकाऊपणा नवीन निकष...

0
घर खरेदी करण्याचे निकष आता फक्त स्थान, किंमत आणि सुविधा नाहीत, तर टिकाऊपणा (सस्टेनेबिलिटी) देखील आहे. प्रॉपटेक फर्म स्क्वेअर यार्ड्सच्या एका अहवालानुसार, ग्रीन...

मेस्सीच्या वाढदिवसानिमित्त सर्वात मोठा 85 फुटांचा पुतळा:70 टन स्टील, 18 महिन्यांत तयार झाला; विश्वचषकात...

0
अर्जेंटिनाच्या कर्णधार लिओनेल मेस्सीच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला. बुधवार, २४ जून रोजी अर्जेंटिनाच्या पाटागोनियामधील कटराल शहरात मेस्सीच्या ८५ फूट...
error: Content is protected !!