Homeदेश-विदेशUBT Shivsena Mention PM Modi Slams CM devendra fadnavis Over His comment...

UBT Shivsena Mention PM Modi Slams CM devendra fadnavis Over His comment calling MNS Shivsena Victory Rally Vijayi Melava Of Raj Thackeray Uddhav Thackeray as rudali


पंतप्रधान मोदी रडत उधव शिवसेना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला ‘रुदाली’ म्हटल्याने उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच संतापली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना फडणवीसांनाही सुनावलं आहे. फडणवीस यांनी ‘मराठी’ विजयाचा जल्लोष करणाऱ्या मराठी अस्मितेला मृत्यूसमयी पैसे घेऊन रडणाऱ्या बायकांची उपमा द्यावी यासारखी राज्याची शोकांतिका नाही, असं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदींच्या रडण्याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.

हीच मराठी भाषेची परंपरा

“मराठी भाषा, मराठी साहित्याची नि कलेची परंपराच अशी तेजस्वी आहे की, महाराष्ट्र सरस्वतीच्या दरबारातील वीणा झंकाराला अन्यायाशी लढणाऱ्या शाहीराच्या डफाची सदैव साथ मिळाली आहे. आजचा मराठी माणूस याच तेजस्वी आणि स्वाभिमानी परंपरेचा खरा वारसदार आहे. एकीकडे भागवत ग्रंथ लिहून भक्ती सुमनांचा वर्षाव करीत असतानाच दुसरीकडे रामायण लिहून मोगल परचक्राशी लढण्याची वीरश्री गुप्तपणे महाराष्ट्रात जागवणाऱ्या एकनाथ महाराजांची परंपरा मराठी भाषा आणि साहित्याची आहे. मराठी भाषेसाठी आणि मराठी जनतेसाठी वाटेल तो छळ सोसून पुन्हा लढण्यासाठी सज्ज होणाऱ्या ज्ञानेश्वर, तुकाराम, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजांची परंपरा हीच मराठी भाषेची परंपरा आहे,” अशी आठवण ठाकरेंच्या सेनेनं अग्रलेखातून करुन दिली आहे.

मोदी वगैरेंच्या सभेला टाळ्या वाजविण्यासाठी भाड्याने माणसे आणणे फडणवीसांना…

“राजस्थान, हरयाणा, बुंदेलखंड, मध्य प्रदेश वगैरे भागांत ‘रुदाली’ हा प्रकार आहे. एखाद्याच्या घरी मृत्यू वगैरे काही दुःखद प्रसंग घडला असेल तर तेथे भाड्याने म्हणजे पैसे मोजून रडण्यासाठी, छाती पिटून आक्रोश करण्यासाठी (श्रीमंतांच्या घरी) बायका बोलावल्या जातात. रोख पैसा घेऊन त्या रडतात व निघून जातात. फडणवीस यांनी ‘मराठी’ विजयाचा जल्लोष करणाऱ्या मराठी अस्मितेला मृत्यूसमयी पैसे घेऊन रडणाऱ्या बायकांची उपमा द्यावी यासारखी राज्याची शोकांतिका नाही. फडणवीस व त्यांच्या पक्षाकडे प्रचंड धनसंपत्ती आहे. हा लुटीचा माल आहे. त्यामुळे रडण्यासाठी, हसण्यासाठी, मोदी वगैरेंच्या सभेला टाळ्या वाजविण्यासाठी भाड्याने माणसे आणणे त्यांना परवडू शकते. अस्सल स्वाभिमानी मराठी माणूस या स्वाभिमान विक्रीच्या भानगडीत पडत नाही. तो मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी इतिहास व त्यातील मर्दानी बाण्यावर मनापासून प्रेम करतो,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलंय.

गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची ‘रुदाली’

“इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध आपल्या प्रतिभेची नंगी समशेर पाजळणाऱ्या कवी गोविंदांची, ‘केसरी’कार टिळकांची, कवी विनायकांची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची, शिवराम महादेव परांजपे यांची, काकासाहेब खाडिलकरांची, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, आचार्य अत्रे, व्यंगचित्रकारीतून महाराष्ट्राच्या दुश्मनांना घायाळ करणाऱ्या आणि मराठी जनांवरील अन्यायाविरोधात ‘शिवसेना’ स्थापन करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. या परंपरेत भाजप व त्यांचे बगलबच्चे कोठेच बसत नसल्याने ते महाराष्ट्राच्या मर्दानगीस ‘रुदाली’ म्हणून हिणवत आहेत. देशात गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांची ‘रुदाली’ सुरू आहे. इतकी मोठी सत्ता हाती मिळूनही आजही पंडित नेहरू, गांधी कुटुंबाच्या नावाने खडे फोडायचे व स्वतःचे अपयश झाकण्यासाठी रडायचे यासारखी दुसरी ‘रुदाली’ नसेल,” असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.

मोदी रडू लागले की…

“मोदी रडू लागले की, देशात इतरांचे रडगाणे सुरू होते व देशात दुःखाचा माहौल निर्माण होतो. भारतासारख्या महान देशाच्या मर्द गर्जनेची यांनी ‘रुदाली’ केली. त्यामुळे मुंबईतला मराठी मर्दांचा उसळलेला सागर देवेंद्र फडणवीस यांना ‘रुदाली’ वाटत असेल तर त्यांनी स्वतःची ‘रुदाली’ सुरूच ठेवावी! फडणवीसांची ‘रुदाली’ म्हणजे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा आवाज नाही!” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!