Homeदेश-विदेशViral News : सकाळी कोर्टात प्रेमविवाह अन् रात्री...एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं,...

Viral News : सकाळी कोर्टात प्रेमविवाह अन् रात्री…एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, प्रकरण ऐकून बसेल धक्का


गुन्हेगारीची बातमी : सकाळी प्रेयसीसोबत कोर्टात जाऊन त्याने लव्ह मॅरेज केलं. पण त्याच रात्री प्रियकराने घरी आल्यावर आत्महत्या केली. या घटनेनंतर कोलार जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. प्रियकर आणि प्रेयसीने लग्न केल्यानंतर घरात सर्वजण आनंदी होते. घरात उत्सवाचं वातावरण होतं. जोडप्याने नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. पण ही नवीन सुरुवात सकाळी सुरु झाली आणि रात्री संपुष्टात आली. असं नेमकं काय झालं की तरुणाने लग्नाच्या काही तासांमध्ये आपलं आयुष्य संपवलं.

का संपवलं तरुणाने आपलं आयुष्य?

हरीश बाबू असं या तरुणाचं नाव आहे. तो कोलार शहरातील रहिवासी होता. हरीशने प्रियसीसोबत सकाळी कोर्टात जाऊन लग्न केलं. लग्नाच्या दिवशी सर्व काही ठीक होते. तो कोणतेही चुकीचे पाऊल उचलेल याबद्दल कोणालाही शंकाही आली नाही. पण त्याच रात्री हरीशने घरी आल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर केवळ कुटुंबालाच नव्हं तर संपूर्ण शहरात दुःख पसरलं. हरीशने त्याच्या लग्नासाठी तीन दिवसांची सुट्टी घेतली होती. तो आनंदी दिसत होता. पण लग्नानंतर जे घडलं ते सर्वांना हादरवून टाकणारे होतं. लग्नाच्या रात्री त्याने आत्महत्या केली असे काय घडले हे कुटुंब आणि नातेवाईकांना अजूनही समजण्यापलिकडलं होतं.

लग्न करण्याचा निर्णय खरोखरच त्याचा स्वतःचा होता का?

पोलीस तपासात असे दिसून आलं की सुरुवातीला हरीश या लग्नासाठी तयार नव्हता. त्याने लग्न करण्यासही नकार दिला होता. पण मुलीच्या कुटुंबाने त्याच्यावर दबाव आणला आणि शेवटी हरीश कोर्टात लग्न करण्यास तयार झाला. आता प्रश्न असा आहे की, त्याने हे लग्न मनापासून केलं की फक्त समाज आणि नातेवाईकांच्या भीतीपोटी केलं याचा तपास पोलीस घेत आहेत.

दारूच्या नशेत आत्महत्या निर्णय..?

प्राथमिक माहितीनुसार, हरीशने आत्महत्या करण्यापूर्वी दारू प्यायली होती. दारूच्या नशेत त्याच्या मनात नकारात्मक विचार आले आणि त्याने हे भयानक पाऊल उचलले असा पोलिसांना संशय आला आहे. पण, अद्याप याची पूर्ण पुष्टी झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. म्हणूनच आता मुलीचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांची चौकशी केली जात आहे. लग्नानंतर काही वाद झाला होता का की हरीश इतर काही कारणामुळे मानसिक तणावाखाली होता हे पोलीस शोध घेत आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे ‘एक...

0
भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीकडून अंतरिम पोटगीची (मेंटेनन्स) मागणी केली होती. ही मागणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या...

24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या...

0
बुधवार, 24 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात नफा होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांचा जमिनीशी संबंधित वाद...

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

0
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर...
spot_img

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
error: Content is protected !!