Homeदेश-विदेशनारायण मार्थिस नंतर टेक जॉब 70 तासांच्या वर्कविक स्टॅटमेंट इन्फोसिस कर्मचार्‍यांसाठी वर्क...

नारायण मार्थिस नंतर टेक जॉब 70 तासांच्या वर्कविक स्टॅटमेंट इन्फोसिस कर्मचार्‍यांसाठी वर्क लाइफ बॅलन्स पॉलिसी आणतात


इन्फोसिस नवीन कर्मचारी धोरणे: (Private Sector Jobs) खासगी क्षेत्रांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासांपासून ते अगदी त्यांच्या (Salary) पगारापर्यंत अनेक गोष्टी कायमच चर्चेचा विषय ठरतात. त्यातच जेव्हाजेव्हा हे मुद्दे चर्चेत येतता तेव्हातेव्हा बऱ्याच काळापूर्वी इन्फोसिसचे सहसंस्थापक (Narayana Murthy) नारायण मूर्ती यांनी केलेल्या एका वक्तव्याचीसुद्धा बरीच चर्चा होते.

ही चर्चा म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी 70 तासांचा कार्यालयीन आठवडा असावा, या त्यांच्या वक्तव्याची. एकिकडे मूर्ती यांनी नव्या पिढीकडून अधिकाधिक उत्पादनक्षम कामाची अपेक्षा जाहीररित्या बोलत आपली ठाम भूमिका मांडली. मात्र आता त्यांच्याच कंपनीनं कर्मचाऱ्यांना नोकरी आणि खासगी आयुष्यात संतुलन राखण्याच्या सल्लापर सूचना करत लक्ष वेधलं आहे. एका अर्थी मूर्ती यांना घरचाच अहेर मिळाला असं म्हणणं इथं गैर ठरणार नाही.

नियमित कार्यालयीन तासांमध्ये काम करा…

इन्फोसिसच्या (Bengaluru) बंगळुरू येथील मुख्यालयाकडून कर्मचाऱ्यांना एक Email पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये त्यांना नियमित कार्यालयीन तासांमध्येच काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रामुख्यानं कार्यालयाबाहेरून अथवा Work From Home करत असणाऱ्यांनी याची विशेष काळजी घ्यावी असंही मेलमध्ये म्हटलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना हा ईमेल मिळाला आहे त्या कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक वेळापर्यंत काम केल्यानं त्यांना या सूचना करण्यात आल्या आहेत.

जास्त काम कराल, तर ई-मेल येईल!

कंपनीतील एका कर्मचाऱ्यानं प्रतिष्ठीत माध्यमसमुहाशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार कंपनीमध्ये साधारणत: पाच दिवसांचा कार्यालयीन आठवडा असून, दर दिवशी कर्मचाऱ्यांनी 9 तास 15 मिनिटं काम करणं अपेक्षित आहे. वर्क फ्रॉम होमदरम्यान जर याहून अधिक वेळ काम केलं तर, ही बाब लक्षात घेत ती अधोरेखित केली जाते. कर्मचारी किती वेळ काम करत आहेत यावर HR विभागाकडून पूर्ण लक्ष ठेवलं जातं आणि एखाद्या कर्मचाऱ्यानं निर्धारित वेळेहून अधिक काम केलं तर मात्र त्यांना ई-मेल पाठवण्यात येतो.

कंपनी घेतेय कर्मचाऱ्यांची काळजी…

कंपनीकडून पाठवण्यात येणाऱ्या मेलमध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासमवेत ‘वर्क लाईफ बॅलेन्स’ करण्याच्याही सूचना केल्या जातात. जेणेकरून कामाच्या वेळेत त्यांना प्रभावीपणे पूर्ण लक्ष कामावरच केंद्रीत करता येईल. कंपनीच्या एचआर विभागानं या मेलमध्ये म्हटलं, ‘आम्हाला तुमची कामाप्रती असणारी बांधिलकी आणि जबाबदारी लक्षात येते. मात्र आम्हाला असंही वाटतं की, एक सकारात्मक संतुलन राखणं तुमच्या चांगल्यासाठी आणि दीर्घ काळ चांगलं यश मिळवून देण्यासाठी महत्त्वाचं ठरेल’.

सुट्टीच्या दिवशी कामाची चर्चाच नको…

अनेकदा कामाचा वाढता ताण पाहता कामाचे तास वाढतात. मात्र अशा वेळी मध्ये मध्ये विश्रांती घेणंही गरजेचं असल्याचं म्हणत कामाचा ताण येत असल्यास त्याचा प्राधान्यक्रम निर्धारित करण्यासाठी Team Manager सोबत चर्चा करण्याचा सल्ला कंपनीनं दिला आहे. इतकंच नव्हे, तर कामातून मिळणाऱ्या सुट्ट्या कामाचा ताण कमी करण्यासाठी असून, शक्य आहे तितक्यांदा यादरम्यान कामाची चिंता आणि चर्चा न केलेलीच बरी असंही या मेलमध्ये स्पष्टच सांगण्यात आलं आहे.

कर्मचाऱ्यांसाठी नवनवीन सुविधा…

2023 पासून इन्फोसिसनं सव्वातीन लाखहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी ‘हायब्रिड’ वर्क मॉडेलच्या दिशेनं पावलं उचलली. जिथं, कर्मचाऱ्यांनी महिन्यातून फक्त 10 दिवसच ऑफिसला येऊन काम करणं अपेक्षित असल्याचं सांगितलं.

एकिकडे नारायण मूर्ती यांचं 70 तासांच्या कार्यालयीन आठवड्याबाबतचं वक्तव्य आणि दुसरीकडे कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं केलेला विचार पाहता सध्या इन्फोसिसच्या या नव्या धोरणाचं कर्मचारी वर्गाकडून कौतुक होत आहे. इतकंच नव्हे, तर आपआपल्या संस्थांनीसुद्धा यातून आदर्श घेत कर्मचाऱ्यांची पिळवणूक आणि फसवणूक टाळावी असाही सूर खासगी क्षेत्रातील कर्मचारी वर्गानं आळवल्याचं पाहायला मिळत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

0
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर...

गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5...

0
काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत...

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात...

0
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून...
spot_img

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
error: Content is protected !!