शेफली जरवाला: अभिनेत्री अन प्रसिद्ध मॉडेल शेफाली जरीवालानं (Shefali Jariwala) वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी तिच्या अचानक झालेल्या या निधनानं तिचा नवरा पराह त्यागीला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत राहत्या घरी तिनं अखेरचा श्वास घेतला. शेफालीला तिच्या नवऱ्यानं आणि कुटुंबातील लोकांना रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं. शेफालीच्या मृत्यूनंतर तिचा एका भारतीय क्रिकेटर सोबत पार्टी करतानाच व्हिडीओ व्हायरल होतोय.
शेफालीच्या मृत्यूनंतर व्हायरल होतोय व्हिडीओ :
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात शेफाली क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि तिचा पती पराग त्यागी सोबत डान्स आणि मस्ती करताना दिसतेय. 9 नोव्हेंबर 2024 मध्ये पृथ्वी शॉचा 25 वा वाढदिवस होता, यात त्याचे सर्व मित्र हे पृथ्वी सोबत डान्स करताना पाहायला मिळाले.
पृथ्वी शॉला टीम इंडियात मिळत नाही संधी :
पृथ्वी शॉ मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पृथ्वी शॉने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताकडून पदार्पण केलं होतं मात्र त्याचा खालावत चाललेला परफॉर्मन्स, फिटनेस इत्यादी कारणांमुळे त्याला टीम इंडियात संधी मिळत नाहीये. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा पृथ्वी शॉला मुंबईकडून मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळत नाहीये. आयपीएल २०२५ मध्ये सुद्धा पृथ्वी शॉ अनसोल्ड ठरला होता.
पाहा व्हिडीओ :
सचिन, लारा आणि सेहवाग फक्त स्वप्न पाहू शकतील असा माझा माणूस पृथ्वी शॉ वेळ आहे pic.twitter.com/zc1tfsdkf1
हेतू व्यापारी 9 नोव्हेंबर 2024
‘कांटा लगा’ चित्रपटातील सुपरहिट गाणं :
शेफाली जरीवालाने 2004 साली सलमान खान आणि अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपट ‘मुझसे शादी करोगी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शेत्यानंतर सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून साउथ चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होतं. ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ‘कांटा लगा’ या गाण्यावर तिने डान्स केला होता. जे गाणं नंतर खूप सुपरहिट ठरलं. त्यानंतर शेफालीने ‘नच बलिए’, ‘बूगी वूगी’ आणि ‘बिग बॉस 13’ यांसारख्या टीव्ही शोमध्येही झळकलेली पाहायला मिळाली. पुनीत राजकुमारच्या कन्नड चित्रपट ‘हुडुगारु’ मध्ये शेफाली ‘पंकजा’ या गाण्यावर पुनीत राजकुमारसोबत डान्स करताना दिसली होती.
‘हा’ ठरला शेवटचा शो :
शेफाली जरीवाला शेवटची ‘शैतानी रस्में’ या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये नकिया हाजी आणि विभव रॉय हे मुख्य भूमिकेत होते. हा शो एक भारतीय रोमँटिक हॉरर फँटेसी आधारित होता, ज्याचा प्रीमिअर 15 जानेवारी 2024 रोजी स्टार भारत वर झाला होता.






























