Homeमनोरंजनकेदारनाथ यात्रेवरून येताच अमृता खानविलकरची तब्येत बिघडली! Video शेअर करत म्हणाली

केदारनाथ यात्रेवरून येताच अमृता खानविलकरची तब्येत बिघडली! Video शेअर करत म्हणाली

मनोरंजन (चित्रनगरी) : अमृता खानविलकर: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ आणि बद्रीनाथची यात्रा पू्र्ण केली आहे. यावेळी तिच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील होती. काही दिवसांपूर्वीच दोघींनी त्याचे केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेचे फोटो शेअर केले होते. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघींनी केदारनाथ यात्रेचा अनुभव शेअर केला आहे.

दरम्यान, केदारनाथ यात्रेवरून अमृता खानविलकर नुकतीच मुंबईत परतली आहे. मात्र, तिची प्रकृती बिघडली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सध्या अमृता खानविलकर ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार घेत आहे. तसेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने केदारनाथ यात्रेला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबद्दल चाहत्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाली अमृता खानविलकर?

नमस्कार, मी नुकतीच केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेवरून मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच माझी तब्येत बिघडली असून मी प्रचंड आजारी पडली आहे. मला सलाईन लावावं लागलं. केदारनाथमध्ये डोले गोळी घेऊन मी तसेच दिवस काढले. मात्र, आता जर कोणी केदारनाथला जाणार असेल तर त्यांना मी आवर्जून सांगने की, जर तुम्हाला केदारनाथ मंदिराच्या येथे जायचे असेल तर जाण्यापूर्वी तुम्हाला शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण केदारनाथ मंदिर हे समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर अनेक समस्या येतात.

सुरुवातीला जाताना काही वाटत नाही. परंतु, ट्रेक करून खाली परत येताना खूप त्रास होतो. मला देखील खूप त्रास झाला. शेवटचे चार किलोमीटरमध्ये जे झालं ते मी तुम्हाला सांगूही शकत नाही. सध्या मला दुसरा कोणताही त्रास होत नाही पण माऊंटेन सिकनेस अजून आहे. त्यामुळे जर कोणीही केदारनाथला जात असेल तर त्यांनी जवळ ORS ठेवावी. तसेच इतर गोळ्या देखील ठेवाव्यात. पाण्याची बॉटल देखील ठेवावी. तसेच वर जात असताना प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.

सर्वात महत्त्वाचं वरती जात असताना घाईगडबड करू नका. जाताना जसे वातावरण आहे तसा प्रवास करा. मंदिराच्या येथे गेल्यानंतर लगेच खाली येऊ नका. तिथे एक दिवस राहा. दर्शन घ्या. नंतर खाली या. आम्ही गेलो तेव्हा पाऊस नव्हता. आमचं नशीब चांगलं होतं. त्यामुळे कसलीही दगदग झाली नाही. पण वातावरणाचा खूप त्रास झाला. आमची यात्रा खूप सुंदर झाली आणि ती खूप आव्हानात्मक होती. जेवढी वाटते तितकी हा यात्रा सोपी नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असेल पण हा मला आलेला अनुभव मी शेअर केलाय असं तिने सांगितले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!