Homeमहाराष्ट्रसंचालक होताच तेजस्वी घोसाळकरांचे सूर बदलले; म्हणाल्या, 'राजकीय नजरेतून...' नियुक्तीबद्दल दरेकरांचे मानले...

संचालक होताच तेजस्वी घोसाळकरांचे सूर बदलले; म्हणाल्या, ‘राजकीय नजरेतून…’ नियुक्तीबद्दल दरेकरांचे मानले आभार

महाराष्ट्र (मुंबई ) : तेजासवी घोसलकर: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाजपच्या ताब्यात असून शुक्रवारी मुंबै बँक संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर यांच्या निधनाने रिक्त असलेले संचालकपद तेजस्वी यांना देण्यात आलं. यानंतर तेजस्वी यांनी नियुक्तीबद्दल भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला होता. पण त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता मुंबै बँक संचालकपदी तेजस्वी यांची नियुक्त राजकीय वर्तुळात एकच चर्चा होते आहे.

‘नियुक्तीकडे राजकीय नजरेतून पाहणं चुकीचं’

संचालक होताच तेजस्वी घोसाळकरांचे सूर बदलले, असं म्हटलं जातंय. तेजस्वी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत प्रवीण दरेकर यांचं आभार तर मानलेच आहे. शिवाय तेजस्वी यांनी शिवसेना UBT पक्षाला आरसा दाखवलाय. त्या म्हणाल्यात की, त्यांची नियुक्तीच्या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं चुकीचं आहे.

‘पक्षीय जोडे बाजूला ठेवून काम करणे खरा सहकार धर्म’

राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून काम करणे हाच सहकार धर्म असल्याचंही तेजस्वी घोसळकरांनी म्हटलंय. मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दरेकरांसह सर्व संचालक मंडळाचे आभार मानले आहे.

माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या रिक्त असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर माझी एकमताने निवड केल्याबद्दल मी बँकेचे अध्यक्ष मा. प्रविणभाऊ दरेकर तसेच सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार मानते.

एक वर्षांपूर्वीच मी व माझे सासरे विनोद घोसाळकर आम्ही दरेकर साहेबांना भेटून याबाबत विनंती केली होती.

सहकारात राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणे हाच खरा सहकार धर्म आहे, त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणे अत्यंत चुकीचे ठरेल

हा माझा सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा व पहिलाच अध्याय आहे, मात्र माझ्या परिवाराने आजवर केलेल्या कामाचा अनुभव व अभिषेक यांच्या जवळ राहून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून मी चांगले काम करेल याची खात्री देते.

मी पुन्हा एकदा सर्व नेतृत्वाचे आभार मानते.

दरम्यान शिवसेनेचा राजीनामा आणि त्यानंतर मुंबै बँक संचालकपदी नियुक्ती आणि त्यासाठी प्रवीण दरेकर यांचे आभार, यामुळे तेजस्वी घोसाळकर भाजपचा वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता येणारा काळच सांगेल की, तेजस्वी या नेमकं काय निर्णय घेतात.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!