Homeमनोरंजनटेलिग्राम संस्थापक पावेल दुरोव यांनी १०० शुक्राणूंच्या देणग्यांमधून जन्मलेल्या मुलांना त्यांच्या जैविक...

टेलिग्राम संस्थापक पावेल दुरोव यांनी १०० शुक्राणूंच्या देणग्यांमधून जन्मलेल्या मुलांना त्यांच्या जैविक वडिलांच्या २० अब्ज मालमत्तेचा वाटा मिळेल

मनोरंजन  : शुक्राणूंच्या देणग्या जन्मलेल्या मुलांना मालमत्ता मिळेल: श्रीमंत लोक कधी काय करतील याचा भरवसा नसतो, असं म्हटलं जातं. असाच काहीसा प्रकार आता टेलिग्राम या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशनचे संस्थापक आणि अब्जाधीश पावेल दुरोव यांनी केला आहे. पावेल दुरोव यांनी एक खुलासा केलाय. मी माझी सुमारे 20 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.67 लाख कोटी रुपये) किमतीची मालमत्ता स्पर्म डोनेट करुन जन्मलेल्या 100 मुलांमध्ये वाटणार आहे, असं दुरोव यांनी जाहीर केलं आहे. ‘ले पॉइंट’ या फ्रेंच मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दुरोव यांनी ही माहिती दिली. मी अलीकडेच माझे मृत्युपत्र तयार केले आहे, ज्यामध्ये या निर्णयाचा समावेश आहे, असं दुरोव यांनी स्पष्ट केलं आहे.

दान केलेल्या स्पर्ममधून 15 वर्षात 12 देशांमध्ये जन्मली 100 हून अधिक मुलं

पावेल दुरोव यांनी सांगितले की, त्यांनी 15 वर्षांपूर्वी एका मित्राला मदत करण्यासाठी शुक्राणू म्हणजेच स्पर्म दान करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी दान केलेल्या स्पर्ममधून 12 वेगवेगळ्या देशांमध्ये 100 हून अधिक मुले जन्माला आली आहेत. “मी या मुलांना स्वतःच्या मुलांसारखे मानतो. माझ्यासाठी ही सर्व मुले समान आहेत, मग ती माझ्या जोडीदारापासून जन्मलेली असोत किंवा स्पर्म डोनेशनमधून जन्मलेली असोत,” असं दुरोव म्हणाले.

तो त्याच्या मुलांना ३० वर्षे वारसाहक्कापासून दूर ठेवेल

स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून जन्मलेल्या मुलांनी कठोर परिश्रम करावेत, स्वतःचे जीवन घडवावे आणि केवळ आपण वारसा हक्काने दिलेल्या पैशावर अवलंबून राहू नये, अशी दुरोव यांची माफक अपेक्षा आहे. मात्र हीच अपेक्षा डोक्यात ठेवत त्यांनी या मुलांना संपत्ती देण्याच्या निर्णयाबरोबरच एका अटीचाही समावेश केला आहे. दुरोव यांची मुलं पुढील 30 वर्ष वडीलांच्या संपत्तीचा, मालमत्तेचा वापर करू शकणार नाहीत. असा थेट उल्लेखच मृत्यूपत्रात करण्यात आलाय.

…म्हणून लवकर लिहिलं मृत्यूपत्र

कुटुंबसंस्थेचा तुमच्या लेखी नेमका काय अर्थ आहे असे विचारले असता दुरोव यांनी, “कुटुंब हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे,” असं उत्तर दिलं. एवढ्या लवकर मृत्यूपत्र लिहून ठेवण्याचं कारही दुरोव यांनी सांगितलं आहे. “मृत्युपत्र लवकर लिहिण्यामागील कारण म्हणजे मी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करतो ज्यामुळे मी काही शक्तिशाली देशांसह अनेक शत्रू बनवले आहेत,” असा खुलासाही दुरोव यांनी केला. दुरोव यांच्या संपत्तीचा विचार केल्यास 100 मुलांमध्ये त्यांची संपत्ती वाटल्यास प्रत्येकाच्या वाट्याला 1670 कोटी रुपये येतील.

मृत्यूनंतर टेलिग्रामचं काय होणार याची काळजी

दुरोव यांना वाटते की त्यांनी तयार केलेले टेलिग्राम प्लॅटफॉर्म त्यांच्या मृत्यूनंतरही स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिले पाहिजे. म्हणूनच, त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत एक ना-नफा ना तोटा तत्वावर काम करारी संस्था टेलिग्राम हाताळेल असं नमूद करु ठेवलं आहे.

अनेकांनी करुन दिली त्या विधानाची आठवण

दुरोव यांनी स्पर्म डोनेशनमधून जन्मलेल्या मुलांनाही आपल्या मुलांचा दर्जा दिला असतानाच अनेकांनी दुरोव यांनी काही काळापूर्वी मला माझ्या मुलांना माझ्यावर निर्भर राहू द्यायचं नाहीये असं म्हटलं होतं याची आठवण करुन दिली आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!