Homeदेश-विदेशराज्य सरकार तिसऱ्यांदा 'एचएसआरपी' नंबर प्लेट्सच्या स्थापनेसाठी अंतिम मुदत वाढवते

राज्य सरकार तिसऱ्यांदा ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट्सच्या स्थापनेसाठी अंतिम मुदत वाढवते

देश-विदेश : 2019 पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसवण्यासाठी राज्य सरकारने 30 मार्च पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 30 एप्रिलपर्यंत देण्यात आली. यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना हे टेंडर दिले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन विभागात उच्च सुरक्षा पाटी बसवण्यासाठी कार आणि बाईक चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, वाहनांची संख्या आणि वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे राज्य सरकारने या पाट्या बसविण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ आता 15 ऑगस्टपर्यंत असणार आहे.

जर आपण नवीन दिलेल्या मुदतवाढीचा विचार केला तर दररोज 3 लाख 16 हजार 71 वाहनांना पाटी बसवावी लागणार आहे. काही ठिकाणी तर दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा वाहनचालकांना करावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलेल्या मुदतीमध्ये या पाट्या लावता येणार नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने मुदतवाढ दिली आहे.  मात्र, मुंबईसह इतर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये वाहनधारकांनी अजूनही पाट्या लावल्याचं दिसून येत नाही. शासनाने या आधी देखील दोन वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु अजूनही काही वाहनधारक नंबर प्लेट बसवत नसल्याचं दिसून येत आहे.

HSRP म्हणजे काय?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही खास प्रकारची नंबर प्लेट आहे. जी बनावट नंबर प्लेट्स व वाहन चोरी रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2019 पूर्वी विकली गेलेली सर्व वाहने ज्यामध्ये दुचाकी, चारचाकीसह इतर सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.

सरकारने दिलेल्या मुदतीनंतर जर वाहनावर HSRP नंबर प्लेट नसेल तर त्या वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर ही नंबर  प्लेट बसवावी असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यात किती दर?

यामध्ये दुचाकीसाठी इतर राज्यामध्ये जीएसटी वगळून 420 ते 480 रुपये इतका दर आहे. तर राज्यात हाच दर 450 रुपये इतका आहे. तीनचाकी वाहनांसाठी इतर राज्यात 450 ते 550 इतका दर आहे तर महाराष्ट्रात हाच दर 500 रुपये इतका आहे. चारचाकी वाहनासाठी इतर राज्यांमध्ये 690 ते 800 रुपये इतका दर आहे. हाच दर महाराष्ट्रात जीएटसी वगळून 745 रुपये इतका आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...

भारतावर 100% शुल्क लावू शकतो अमेरिका:रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाईची तयारी, संसदेत विधेयक...

0
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकन सिनेटमध्ये एक विधेयक सादर करण्यात आले आहे, ज्यात भारत, चीनसह...

भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक:दावा- हॅकर्सनी ब्लूप्रिंट, पुरवठादार आणि इतर नोंदींची माहिती...

0
भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या कुडनकुलमशी संबंधित हजारो दस्तऐवज लीक झाले आहेत. रॉयटर्सनुसार, 'वर्ल्ड लीक्स' या हॅकर्स ग्रुपने हे दस्तऐवज डार्क...
spot_img

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...

स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच

0
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
error: Content is protected !!