Homeमुळशीहिंजवडीत मुसळधार पावसाने उघड केल्या पायाभूत समस्या; नागरिक त्रस्त

हिंजवडीत मुसळधार पावसाने उघड केल्या पायाभूत समस्या; नागरिक त्रस्त

हिंजवडीत मुसळधार पावसाने उघड केल्या पायाभूत समस्या; नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे सवालांची सरबत्ती

मुळशी (हिंजवडी दि.19) : मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हिंजवडी आयटी पार्क परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या अविरत पावसामुळे आयटी पार्कमधील रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

सहाच नाही, तर सात किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा!

दररोज सकाळी आणि संध्याकाळी आयटी पार्क परिसरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेक ठिकाणी सहा ते सात किलोमीटरपर्यंत ही कोंडी पसरते. त्यामुळे वेळेवर ऑफिस गाठणं आव्हानात्मक ठरतंय. स्थानिक नागरिक आणि आयटी प्रोफेशनल्समध्ये प्रशासनाविषयी नाराजीचा सूर चढताना दिसतो आहे.

पावसाने उघड केल्या व्यवस्थेच्या त्रुटी

मे अखेरीस वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसानंतर सुरू झालेला मान्सून हिंजवडी परिसरात दमदार बॅटिंग करत आहे. या पावसामुळे येथील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था समोर आली आहे. रस्त्यांवरील खड्डे, जलनिचऱ्याची दुर्लक्षित यंत्रणा आणि वाहतुकीचा गोंधळ सध्या नागरिकांच्या नशिबी आलेला त्रास ठरतोय.

हिंजवडी परिसरातील प्रमुख अडचणी :

  • कायमस्वरूपी खड्डेमय रस्ते
  • संथगतीने सुरू असलेलं मेट्रोचे काम
  • लेन मार्किंगचा अभाव
  • अवजड वाहनांची दिवसभर वर्दळ
  • बेशिस्त आणि अनियंत्रित वाहतूक
  • अपुऱ्या मनुष्यबळाचे वाहतूक पोलीस
  • नष्ट झालेले नैसर्गिक ओढे, वगळ
  • जलप्रवाह मार्गांवरील अतिक्रमण
  • चोकअप झालेली स्टॉर्म वॉटर ड्रेनेज
  • पाण्याचा निचरा करणाऱ्या उपाययोजनांचा अभाव
  • भौगोलिक रचनेची अवहेलना करत केलेले रस्ते नियोजन
  • प्रशासन यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव

‘पाणी साचते, कोंडी वाढते’

फेज तीनकडील डोंगर-पठार भाग, फेज तीन ते फेज दोन मुख्य रस्ता, पद्मभूषण चौक, गवारे मळा, माणदेवी चौक, राक्षे वस्ती, बोडकेवाडी फाटा, शिवचा ओढा, वडजाईनगर, जॉय व्हिला रस्ता, धुमाळ वस्ती, विनोदे वस्ती, भटेवारानगर आणि भूमकर चौक अंडरपास या भागात पावसाचे पाणी साचून राहते. परिणामी वाहतुकीचा संपूर्ण बोजवारा उडतो.

नागरिकांच्या प्रतिक्रिया :

“प्रामुख्याने वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. तसेच, बाराही महिने रस्ते सुस्थितीत ठेवले गेले पाहिजेत. रहदारीच्या वेळी वाहतूक पोलिसांची उपस्थिती गरजेची आहे.” : अनुप मोरे, (आयटी अभियंता, हिंजवडी)

“सुमारे ६० टक्के आयटी पार्कचा भाग माण ग्रामपंचायत हद्दीत येतो. एमआयडीसी हद्दीतील रस्त्यांचीही दुरवस्था आहे. कचरा आणि सांडपाणी समस्येकडे प्रशासन वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करतंय.”: अर्चना आढाव, (सरपंच, आयटीनगरी माण)

 

प्रशासन झोपेचं सोंग घेणार की धडा शिकणार?

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रोजच्या रोज जाणवणाऱ्या समस्यांवर अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे. आता तरी वरुणराजाच्या कोपातून धडा घेऊन प्रशासन जागं होणार का? की नागरिकांचा त्रास असाच चालू राहणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!