Homeमनोरंजनअभिनेता अशोक साराफने उघडकीस आणले होते

अभिनेता अशोक साराफने उघडकीस आणले होते

मनोरंजन  (चित्र नगरी) : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यानंतर फक्त मराठीच नव्हे तर सर्व चित्रपटसृष्टी आणि जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशोक सराफ यांनी नेहमीच मराठी नाटक, मालिका आणि चित्रपसृष्टीसाठी भरीव योगदान दिलं आहे. त्यांच्या शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे अनेक मित्र आहेत. पण त्यांच्या एका मित्राचं नाव ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटतं, ते म्हणजे नाना पाटेकर आहेत. तसं पाहायला गेल्यास दोघंही प्रत्येक बाबतीत एकमेकांच्या विरुद्ध असताना, त्यांची मैत्री मात्र घट्ट आहे. यामागे कारणंही तशीच आहेत, ज्यांचा खुलासा स्वत: अशोक सराफ यांनी केला होता.

झालं असं होतं की, अशोक सराफ यांच्यावर एकदा जमाव धावून गेला होता. त्यावेळी नाना पाटेकर यांनी प्रसंगावधान दाखवत अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता. नाना पाटेकर नसते तर लोकांनी मला मारलं असतं असं अशोक सराफ यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होतं.

नेमकं काय घडलं होतं?

एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं होतं. “हमिदाबाई नाटकाच्या वेळी नीट दिसत असल्याने लोकांनी गोंधळ घातला होता. पाच मिनिटात पडदा खाली पडल्यानंतर हळूहळू गडबड वाढू लागली. प्रेक्षक संतापले आणि सगळ्या खुर्च्या तोडून टाकल्या, ट्युबलाईट फोडल्या. लोकांनी बसच्या काचा फोडल्या. नाना पाटेकरला संभाव्य धोक्याची कल्पना आली होती. त्याला मी टार्गेट आहे हे लक्षात आलं. त्यावेळी नाना पाटेकरने मला तेथून अक्षरश: पळवलं होतं. थिएटरच्या मागच्या बाजूने गटारातून उडी मारुन आम्ही पळालो. मला घेऊन तो अक्षरश: धावत होता,” अशी आठवण त्यांनी सांगितली होती.

“ढकलण्याची जी रिक्षा असते ती त्याने थांबवली. तो स्वत: चालवू लागला आणि मला घेऊन गेला. नाना पाटेकरने माझा जीव वाचवला आहे. मी नानाचे उपकार विसरु शकत नाही. जर नाना नसता तर लोकांनी माझे तुकडे केले असते,” अशी आठवण अशोक सराफ यांनी मुलाखतीत सांगितली होती.

“नाना पाटेकर आणि माझा सहवास फक्त आठ महिन्यांचा होता. आम्ही एकत्र काम केलं होतं. एक दोन चित्रपट आम्ही सोबत केले. पण त्याला सहवास म्हणता येणार नाही. पण हमीदाबाईची कोठी नाटकाच्या निमित्ताने आम्ही आठ महिने एकत्र होतो. हमीदाबाईची कोठीदरम्यान त्याची आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली जी आजपर्यंत आहे. महत्त्वाचं म्हणजे नाना पाटेकरही ते मानणारा आहे त्यामुळे जास्त आहे. त्याला माझा स्वभाव आवडला आणि मला त्याचा स्वभाव आठवला. तो खडूस वाटतो, पण तसा तो नाही. तो सरळ आहे, फक्त स्पष्टवक्ता आहे. पण तो त्याचा गुणच आहे. मैत्रीला एकदम छान माणूस आहे. तुम्ही अडचणीत आहात सांगितलं तर तो केव्हाही मदतीला धावून येऊ शकतो. अंगावरचे कपडेही काढून देईल असा माणूस आहे,” असं सांगत अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतची मैत्री उलगडली होती.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...

0
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!