शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडीला डावलून स्वबळावर लढवण्याचे संकेत दिलेत. 2-4 जागा घेऊन आम्ही आघाडी करणार नाही. सन्मानजनक जागा मिळणार असतील तर आम्ही आघाडीसोबत राहू. अ
?
भास्कर जाधव मागील 3 दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांना महाविकास आघाडीत 2-4 जागा मिळत असतील तर आघाडी करण्याची काहीही गरज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कार्यकर्त्यांना लबाड भाजपपासून सावध राहण्याचाही सल्ला दिला.
जागा वाटपात आपलाही वाटा तेवढाच महत्वाचा
राज्यात आपला पक्ष मोठा आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. आजही महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे आहेत. आघाडीतील पक्षांनी स्थानिक नेत्यांना स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत. पण याचा अर्थ आपल्या सग्यासोयऱ्यांसाठी 2-4 जागा घ्यायच्या आणि बाकी सोडून द्यायचे याला आघाडी झाली असे म्हणता येणार नाही. जागा वाटपात आपलाही वाटा तेवढाच महत्वाचा असला पाहिजे.
आपल्याला दोन-चार जागा घेऊन आघाडी करायची नाही. सन्मानजनक जागा मिळणार असतील तरच आपण आघाडीसोबत राहू. कारण, आघाडीसोबत राहून निवडणूक लढायची की स्वबळावर लढायची हा प्रश्न आता राहिला नाही. हा जर-तरचा प्रश्न आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.
भाजप जुना लबाड मित्र
भास्कर जाधव यांनी यावेळी भाजप हा शिवसेनेचा जुना लबाड मित्र असून त्यापासून सावध राहण्याचेही आवाहन केले. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना केली जाणार आहे. त्याचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. ही प्रभाग रचना करताना काही मते इकडची तिकडे आणि तिकडची इकडे केली जाणार आहेत. कारण भाजप सध्या सत्तेत आहे. तो किती लबाड आहे हे आम्हाला चांगलेच ठावूक आहे. त्यामुळे आधी प्रभाग रचना कशी केली जाते? यावर बारईकाने लक्ष ठेवा. सोबतच निवडणुकीची तयारी सुरू ठेवा, असे ते म्हणाले.
हे ही वाचा…
कुंडमळा दुर्घटनेवेळी किती पर्यटक पुलावर होते?:घटनेची दाहकता दाखवणारा PHOTO समोर; खचाखच गर्दी अन् मधोमध पुल तुटला
पुणे – इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळून रविवारी 4 जणांचा बळी गेला. पर्यटकांचा भार न पेलल्यामुळे हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. आता या घटनेचा एक फोटो समोर आला आहे. त्यात हा पूल कोसळण्यापूर्वी त्यावर किती भयंकर गर्दी होती हे दिसून येत आहे. वाचा सविस्तर






























