दिव्य मराठी नेटवर्क | लंडन2 दिवसांपूर्वी
- कॉपी दुवा
- युरोपच्या ॲडव्होकेसी समूहाचा अहवाल, १४ वर्षांत बोनेटची सरासरी उंची ७ सेंमी वाढली
गाड्यांचे बोनेट दिवसेंदिवस उंच होत आहेत आणि ते मुलांसाठी धोका ठरत आहेत. अलीकडच्या एका अहवालानुसार, युरोप आणि ब्रिटनमध्ये उंच बोनेट असलेल्या एसयूव्ही पादचाऱ्यांसाठी आणि मुलांसाठी घातक ठरत आहेत. या वाहनांची रचना केवळ रस्ता सुरक्षेला आव्हान देत नाही तर निष्पाप जीवांनाही धोका निर्माण करत आहे. युरोपच्या अॅडव्होकेसी ग्रुप ट्रान्सपोर्ट अँड एन्व्हायर्नमेंट (टी अँड ई) च्या अहवालात दावा केला आहे की उंच बोनेटच्या कारच्या चालकांना ९ वर्षांपर्यंतची मुले थेट त्यांच्या कारसमोर उभी असली तरी दिसत नाहीत. त्यांचे बोनेट इतके उंच आहे की मुले चालकाच्या नजरेतून येत नाहीत. अपघातात मुलांना गंभीर दुखापत किंवा मृत्यू होऊ शकतो. मोटारिंग संशोधन संस्था आरएसी फाउंडेशनचे संचालक स्टीव्ह गुडिंग म्हणतात, ‘जर पादचाऱ्याची उंच बोनेटच्या कारशी टक्कर झाल्यास दुखापत थेट डोके किंवा शरीराच्या महत्त्वाच्या भागांवर होते. मुलांसाठी धोका जास्त. कारण ते चिरडले जाण्याचा धोका असतो. याउलट, कमी उंचीच्या बोनेटच्या कार पायांना इजा पोहोचवतात. त्यामुळे पादचारी बाजूला पडून ते बचावाची संधी मिळू शकते.’ ब्रिटनमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. लँड रोव्हर व जीपसारख्या ब्रँडच्या उंच बोनेटच्या वाहनांचे रस्त्यांवर वर्चस्व आहे. त्यांच्या बोनेटची सरासरी उंची १०० सेमीपेक्षा जास्त आहे. हे ब्रँड धोक्यांकडे दुर्लक्ष करतात.
जग्वार, लँड रोव्हरने दावा केला की त्यांची वाहने ३डी कॅमेरा सिस्टिम आणि पादचारी ओळखण्यासाठी स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंगसारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. तथापि, अहवालात स्पष्टपणे म्हटले की तंत्रज्ञान काही प्रमाणात अपघात रोखू शकते, परंतु कमी उंचीची बोनेटची वाहनेच सुरक्षित आहेत.
ब्रिटन-युरोपमध्ये कायदा नाही, त्याची मर्यादा निश्चित व्हावी
अहवालानुसार, २०१० मध्ये युरोपमध्ये नवीन कारच्या बोनेटची सरासरी उंची ७७ सेंमी होती, जी २०२४ मध्ये ८४ सेमी झाली. या काळात एसयूव्हीची विक्रीही १२% वरून ५६% पर्यंत वाढली. याला ‘कारस्प्रेडिंग’ किंवा ‘ऑटोबेसिटी’ असे म्हटले जात आहे. लॉफबरो विद्यापीठाच्या चाचणीत आढळले की रॅमचा चालक ९ वर्षांपर्यंतची मुले पाहू शकत नाही, तर डिफेंडरचा चालक साडेचार वर्षांपर्यंतची मुले पाहू शकत नाही. टी अँड ईच्या बारबरा स्टोल म्हणाल्या की ब्रिटन आणि युरोपमध्ये बोनेटची उंची नियंत्रित करणारा कोणताही कायदा नाही.संशोधक ८५ सेमीची मर्यादा निश्चित करण्याचा आग्रह धरत आहेत.





























