HomeमनोरंजनIND vs ENG: गौतम गंभीरच्या जागी टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? 3...

IND vs ENG: गौतम गंभीरच्या जागी टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? 3 प्रबळ दावेदार!


Ind vs eng: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कौटुंबिक कारणांमुळे भारतात परतलाय. तो इंग्लंडला कधी जाणार? याची कोणतीही माहिती सध्या समोर आली नाहीय. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना 20 जून रोजी होतोय. तोपर्यंत गंभीर परत जाऊ शकेल की नाही? याबद्दल कोणतीही बातमी नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाला सांभाळण्यासाठी तात्पुरत्या प्रशिक्षकाची गरज भासलीय. गौतम गंभीर परत येईपर्यंत भारतीय खेळाडू तात्पुरत्या प्रशिक्षकासोबत सराव आणि प्रशिक्षण घेतील. BCCI नेही विलंब न करता या समस्येवर तोडगा काढला आहे. पण मग गंभीरच्या जागी कोण? असा प्रश्न विचारला जातोय.

गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघासोबत कर्णधार म्हणून काम करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. गौतम गंभीरच्या परतल्यानंतर, भारतीय संघ प्रशिक्षकाशिवाय सराव करत आहे. टीम इंडियाने एक अंतर्गत सराव सामना देखील खेळला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय, इंग्लंडमध्ये टीम इंडियासाठी आव्हान कमी होणार नाही. शुभमन गिल हा नवा कर्णधार आहे आणि इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवेल, त्याच्यासोबत संघातील अनेक खेळाडूही तरुण आहेत. तरुण जोश इंग्लंड संघाचा सामना कसा करेल हे पाहणे बाकी आहे.

पाच सामन्यांच्या मालिकेसह, टीम इंडियाची पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मोहीम सुरू होईल. हा स्पर्धेचा चौथा हंगाम आहे. कालच दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून तिसऱ्या हंगामाचा करंडक जिंकला. सध्या टीम इंडियाला विराट कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? हे देखील पहावे लागेल. रोहितच्या जागी शुभमन गिल किंवा अभिमन्यू ईश्वरन हे सलामीला येतील. चौथे क्रमांक हे महत्त्वाचे स्थान आहेl. तेथे केएल राहुलसारखा अनुभवी खेळाडू आणता येईल. बुमराह गोलंदाजीचे नेतृत्व करेल.

गौतम गंभीरची जागा कोण घेईल?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आईची तब्येत अचानक बिघडल्यामुळे भारतात परतला. अशा परिस्थितीत इंग्लंड दौऱ्यावर सध्या टीम इंडियाकडे मुख्य प्रशिक्षक नाही. गौतम गंभीर परतला नाही तर मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) चे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली जाऊ शकते. मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत व्हीव्हीएस लक्ष्मण सर्वात प्रबळ दावेदार आहे.  लक्ष्मण 19 वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षकही राहिलाय. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करतो. दुसरीकडे जर लक्ष्मणला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवलं नाही, तर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक शितांशू कोटक यांना अंतरिम प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांचे नाव देखील टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. ते देखील अंतरिम प्रशिक्षक बनण्यासाठी दावेदार आहेत. गौतम गंभीर 17 जूनपर्यंत इंग्लंडला परतेल अशी अपेक्षा आहे. पण जर गंभीर परतला नाही तर टीमला अंतरिम प्रशिक्षक देण्यात येईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

तेलंगणा हत्याकांडातील आरोपी राजकुमार मृत सापडला; POCSO प्रकरणातील संशयित

0
हैदराबाद7 तासांपूर्वीलिंक कॉपी करातेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सहा लोकांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पी राजकुमार सोमवारी मृत अवस्थेत आढळला. पोलिसांना त्याचा मृतदेह कोठूर पोलीस ठाण्याच्या...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!