Homeमहाराष्ट्रNagpur Girl Zipline Accident Manali Falls Fractures | नागपूरच्या तरुणीचा मनालीत अपघात:...

Nagpur Girl Zipline Accident Manali Falls Fractures | नागपूरच्या तरुणीचा मनालीत अपघात: झिप-लाइनचा बेल्ट तुटल्याने 30 फूट खाली पडली, सुदैवाने बचावली; थरकाप उडवणारा VIDEO – Maharashtra News

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला गेलेल्या नागपूरच्या एका कुटुंबावर मनालीमध्ये भीषण अपघात ओढवला आहे. झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटल्याने एक तरुणी 30 फूट उंचीवरून खाली पडली, यात तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. त्रिशा बिजवे असे तरुणीचे नाव आहे

?

पर्यटन आणि तेथील सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अनेकदा पर्यटनस्थळी साहसी खेळ खेळतानाही प्रवाशांच्या जीवावर बेतले जाते. अनेकदा पुरेशी सुरक्षा नसतानाही पर्यटकांकडून अतिउत्साहाच्या भरात जीवघेणा टास्क केला जातो. पर्यटनस्थळी साहसी खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास कायबेतू शकते, हे त्रिशासोबत घडलेल्या घटनेवरून दिसून आले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी प्रफुल्ल बिजवे आपल्या पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत उन्हाळी सुट्टीनिमित्त मनालीला गेले होते. रविवार 8 जून 2025 रोजी त्रिशा झिप-लाइन खेळत असताना, तिला जोडलेला बेल्ट अचानक तुटला आणि ती 30 फूट खाली कोसळली. सुदैवाने, झिप-लाइनची उंची जास्त नसल्याने आणि त्रिशा उतरण्याच्या ठिकाणाजवळ असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. या दुर्घटनेनंतर त्रिशावर सुरुवातील मनाली आणि नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ देखील कुटुंबीयांनी शेअर केला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

खाली पाहा घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

त्रिशाच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त

दरम्यान, या दुर्घटनेबाबत बोलताना त्रिशाच्या कुटुंबाने म्हटले की, ‘तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. आमच्या कुटुंबाला तिथे कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे, त्रिशावर सुरुवातीला मनाली, नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेतून प्रत्येकाने धडा घ्यायला हवा. पर्यटनस्थळी साहसी खेळांसाठी मैदानात उतरताना पुरेशी व्यवस्था आहे का हे तपासायला हवं. तसेच, तेथील सुरक्षा व्यवस्था आणि धोके लक्षात घेऊनच साहसी खेळ खेळावे. अन्यथा काही वेळा हे साहस जीवावर बेतण्याची शक्यता असते.’

साहसी पर्यटन की जीवघेणा धोका?

या घटनेनंतर साहसी खेळांच्या आयोजकांवर तसेच स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरवर्षी अशा अपघातांमध्ये अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागतो किंवा गंभीर जखमा होतात. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने कोणताही साहसी खेळ करताना सुरक्षेची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. प्रशासनानेही अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, यावर सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पालखी मिरवणुकीसाठी सातारा पोलिसांचा सुरक्षा आराखडा; 2700 अधिकारी तैनात

0
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी...

अखिलेश यांच्या वकिलांची भाजप खासदाराने मागितली माफी:’टिन्नू टीपूसोबत बोलत होता’ असे म्हटल्याबद्दल म्हणाले- बदनामी...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी टिन्नू यादव याच्यावरून अखिलेश यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. भाजप...

13 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या नोकरदार लोकांना प्रगतीची शक्यता, कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा...

0
13 जुलै, सोमवार रोजी सिंह राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या कामामुळे पदोन्नती मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे....

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...
spot_img

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
error: Content is protected !!