एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या “भाजपासोबतची युती नैसर्गिक आणि राष्ट्रवादीसोबतची युती राजकीय तडजोड” या विधानावर राज्याच्या राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सामंत यांच्या या विधानावर प्रतिक
?
उदय सामंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील युती नैसर्गिक नाही, असे उदय सामंत म्हणतात, तर मग नैसर्गिक आणि अनैसर्गिक युती म्हणजे काय? हे आधी त्यांना स्पष्ट करावे लागेल. शिवसेना-भाजप युतीदेखील कधीकाळी सहज साध्य झालेली नव्हती.”
चौघांनी मिळून युती घडवून आणली
भुजबळ पुढे म्हणाले, 1988-89 साली भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. ही युती तेव्हा अस्तित्त्वात येण्यास अडचण होत होती. मी आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी तसेच भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असे चार जण युती घडवून आणण्याच्या प्रक्रियेत होतोच. आम्ही एकत्र बसून एका महिन्यात युती घडवून आणली.
वाजपेयींचा बाळासाहेबांना संदेश अन्…
छगन भुजबळ म्हणाले, या युतीलाही तेव्हा काही लोकांचा विरोध होता. खरे सांगायचे झाले तर भाजपच्याच काही नेत्यांचा याला विरोध होता. भाजप हा देशपातळीवरचा पक्ष आहे आणि शिवसेना हा राज्यपातळीवरचा पक्ष आहे, त्यामुळे ही युती नको, असे भाजपाचे काही नेते सांगायचे.
मात्र भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एक संदेश पाठवला होता. ”बाळासाहेब आपके पास भुज’बळ’ है, तो हमारे पास बुद्धिबळ है, हमे दोनो एक हो जायेंगे तो चमत्कार हो जायेगा”, असे तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले होते. त्यानंतर ती युती घडून आली, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच नैसर्गिक युती होण्यासाठीदेखील प्रयत्न करावे लागले, असा टोलाही भुजळब यांनी उदय सामंत यांना लगावला.
म्हणाले होते उदय सामंत?
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या युतीबाबत मोठे भाष्य केले होते. आमची आणि भाजपची युती आहे. भाजप आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अनेकदा भाष्य केलेले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आमची राजकीय तडजोड आहे. भाजपसोबतची युती ही आमचा प्राधान्यक्रम आहे. राज ठाकरे यांच्यासारखे नेतृत्त जर आमच्यासोबत येणार असेल तर आम्हाला आनंदच होईल, असे उदय सामंत म्हणाले होते.






























