Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्र राजकारण


सुप्रिया सुले व्हॉट्सअ‍ॅप स्थिती: पुण्याच्या बालेवाडीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दुपारी पार पडत आहे. या वर्धापन दिनासाठी राज्यातील विविध भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षांनी एकत्र यावे का या संदर्भातील चाचपणी या मेळाव्यात होऊ शकते असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. असं असतानाच शरद पवार यांच्या खासदार कन्या आणि अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंनी त्यांच्या खासगी व्हॉट्सअप क्रमांकावरुन ठेवलेलं स्टेटस चर्चेत आहे.

एकामागोमाग दोन स्टेटस

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या आईने दिलेला एक सल्ला व्हॉट्सअप स्टेटसवरुन शेअर केला आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी या स्टेटसमध्ये वापरलेल्या भाषेवरुन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. सुप्रिया सुळे यांनी स्टेटसमुळं चर्चेला उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांची आई प्रतिभा पवार यांनी दिलेला एक सल्ला आपण रोज स्वत:ला आठवण करुन देत असतो असं म्हटलं आहे. हा सल्ला काय आहे हे सांगितलं आहे. मात्र हे स्टेटस अपलोड केल्यानंतर काही वेळाने त्यांनी स्पष्टीकरण असं म्हणत अन्य एक स्टेटस अपडेट केलं.

पहिल्या स्टेटसमध्ये काय?

“आईला सगळं माहिती असतं. माझ्या पालकांनी मला एक सल्ला दिला होता. माझ्या आईने जे मला सांगितलंय त्याची मी स्वत:ला रोज आठवण करुन देते. ‘सहन करायला शिक’,” असं सुप्रिया सुळेंच्या पहिल्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे. त्यांनी हे स्टेटस काल सायंकाळी सहा वाजून 26 मिनिटांनी आपल्या खासगी क्रमांकावरुन अपडेट केलं होतं.

दुसरं स्टेटसही चर्चेत

त्यानंतर त्यांनी अपडेट केलेल्या स्टेटसमध्ये आधीच्या स्टेटससंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “सहन करायला शिक, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो. आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काही करु शकत नाही, परिस्थिती आपल्या हातात नसतात… तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं… कर्तव्य करत राहायची. आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत…”, असं दुसऱ्या स्टेटसमध्ये लिहिलेलं होतं.

सुप्रिया सुळेंनी सांगितलं स्टेटस का ठेवलं…

विशेष म्हणजे अजित पवार यांनी सोमवारी झालेल्या वसंतदादा पाटील शुगर इंस्टीट्यूटच्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्यापासून आपली खुर्ची लांब घेतली होती. यामुळे अनेकांच्या नजरा उंचावल्या होत्या. त्यातच दिल्लीत असलेल्या सुप्रिया वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानिमित्त सोमवारी सायंकाळी महाराष्ट्रात परतल्या. दिल्लीतील पक्षाच्या बैठकीनंतर हे स्टेटस अपडेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विमानात बसल्यानंतर आपल्याला अचानक आईने दिलेला हा सल्ला अचानक आठवल्याने तो स्टेटसला ठेवला असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी बोलताना दिलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- 13 वर्षांच्या मुलींना वाचवा:याच वयात मासिक पाळी सुरू होते, खरे प्रेम...

0
यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी सांगितले- मी काही बोलले की ते व्हायरल होते. माझ्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नसतो. तुम्हाला सर्वोत्तम बनवणे हे...

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!