याच शेततळ्यात गौरव, सतीश दोघांचा मृत्यू झाला.
मृत बापलेक मध्यप्रदेशचे रहिवासी
?
Fardapur | पळसखेडा (ता. सोयगाव) येथीलशिवारातील गट नं. २३० मधील शेत तळ्यात बुडून बापलेकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.पळसखेडा येथील शेतकरी मनोज शेवगन यांचेपळखेडा शिवारात गट. नं. २३० मध्ये शेत आहे. याशेतात काम करण्यासाठी त्यांनी एक वर्षापूर्वीमध्यप्रदेशातील दुलकोट (जि. बुऱ्हाणपूर) येथीलविनोद रमेश डुडवे (३५) यांना मजूर म्हणूनआणले होते. डुडवे हे परिवारासह शेतातच राहतहोते. रविवारी सायंकाळी विनोद डुडवे व त्याचामुलगा मनोज (३) या दोघांचा शेतळ्यात बुडूनमृत्यू झाला. ते दोघे शेततळ्यात का उतरले होते,याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
आडूळला शवविच्छेदन ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेहपोलिसांनी शेततळ्यातून बाहेरकाढले. आडूळ येथील प्राथमिकआरोग्य केंद्रात वैद्यकीयअधिकाऱ्यांनी सतीश आगळे वगौरव आगळे या दोघांना तपासूनमृत घोषित केले. दोन्ही मृतांचेशवविच्छेदन करून मृतदेहनातेवाइकांच्या ताब्यात देण्यातआले. घटनेची पाचोड पोलिसठाण्यात नोंद करण्यात आली.पुढील तपास सहायक पोलिसनिरीक्षक सचिन पंडित यांच्यामार्गदर्शनाखाली बीट जमादाररणजितसिंग दुल्हत करत आहेत.
दोघा भावंडांचे पाय अडकले माशांच्या जाळ्यात फर्दापूर/पाचोड | शेततळ्यात बुडून रविवारी चौघांचा मृत्यूझाला आहे. पहिली दुर्घटना पळसखेडा(ता. सोयगाव), तर दुसरी पैठणतालुक्यातील गेवराई बुद्रुक येथे घडली.
गेवराई बुद्रुक येथील सतीश एकनाथआगळे (१९) व गौरव शिवाजी आगळे (१७) हे चुलत भाऊ होनोबाची वाडी शिवारातील शेत गट नंबर ५५ मधील शेतकरी एकनाथ दगडू आगळे यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते.
शेततळ्यातील पाण्यात उतरताच दोघांचे पाय माशांच्या जाळ्यात अडकला. युवकांनी शेततळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण शेततळ्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ असल्याने युवकांचाप्रयत्न असफल झाला. दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिवारातील सदस्यांसह ग्रामस्थ वपाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले.






























