Homeमहाराष्ट्रउधव ठाकरे शिवसेना राज ठाकरे एमएनएस अलायन्स शरद पवार एमएनएस चीफ येथे...

उधव ठाकरे शिवसेना राज ठाकरे एमएनएस अलायन्स शरद पवार एमएनएस चीफ येथे प्रथम टिप्पणी


उधव-रोज ठाकरे युतीवरील शरद पवार: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तर दुसरीकडे त्यांनी राज यांचे चुलत बंधू आणि शरद पवारांच्या पुढाकाराने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शरद पवारांनी ठाकरेंच्या संभाव्य युतीसंदर्भात भाष्य केलं आहे.

राहुल गांधींच्या लेखाबद्दल बोलले

शरद पवारांनी पत्रकारांशी अनोपचारिक चर्चेदरम्यान सध्या राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असलेल्या अनेक विषयांवर भाष्य केलं. “महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचे मॅच फिक्सिंग!” हा राहुल गांधींचा लेख आपण वाचलेला नसून सध्या तो बाजूला ठेवला असून संध्याकाळी वाचणार असल्याचं शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

‘माझी अशी इच्छा आहे की…’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातही शरद पवारांनी आपली इच्छा पत्रकारांसमोर बोलून दाखवली. पुढील काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलताना शरद पवारांनी, “माझी इच्छा आहे की, महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र लढाव्यात,” असं मत व्यक्त केलं आहे.

राज यांना टोल

पत्रकारांनी शरद पवारांना सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चांगलाच चर्चेत असलेला ठाकरे बंधुंच्या दोन्ही सेनांच्या संभाव्य युतीबद्दल प्रश्न विचारला. राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगर पालिकेत काय परिस्थिती असेल? असं शरद पवारांना विचारण्यात आलं. यावर शरद पवारांनी राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र त्यांना मतं मिळत नाहीत असं म्हटलं, “आता पर्यंतचा माझा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभाना गर्दी होते मात्र त्यांना मतं मिळत नाहीत,” असं विधान पवारांनी केलं.

उद्धव ठाकरेंचं कौतुक

मात्र त्याचवेळेस युतीमधील दुसरे ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख असलेल्या उद्धव यांचं कौतुक शरद पवारांनी केलं. राज यांच्या तुलनेत उद्धव यांना मतांमध्ये परिवर्तन करण्यात अधी यश येतं असं विधान पवारांनी केलं आहे. “उद्धव ठाकरेंना मातामध्ये परिवर्तन करण्यात यश येते,” असं विधान शरद पवारांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीबद्दल बोलताना, “जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल,” असं सूचक विधान केल्याने युती होणार अशी चर्चा अधिक जोमाने होऊ लागली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...

0
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

चीनमध्ये भ्रष्टाचारावर मोठी कारवाई:माजी पोलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई पक्षातून निष्कासित

0
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत, पोलिट ब्युरोचे माजी सदस्य मा शिंगरुई यांना कम्युनिस्ट पक्षातून निष्कासित करण्यात...
spot_img

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
error: Content is protected !!