Homeमनोरंजनमोठी बातमी! बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीच्या जवळच्या मित्राला अटक

मोठी बातमी! बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीच्या जवळच्या मित्राला अटक


बेनग्लुरू चेंगराचेंगरी: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये पंजाब किंग्सचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बंगळुरूमध्ये आरसीबी संघाची विजयी रॅली निघाली मात्र या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसले (Nikhil Sosale) सह तीन लोकांना अटक केली आहे. त्याला मुंबईला जाताना एअरपोर्टवरून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिली नव्हती परवानगी :

ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी आपल्या FIR मध्ये नमूद केलं आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला स्टेडियममध्ये कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेण्याची अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीदेखील संघ व्यवस्थापन, स्टेडियमचे प्रशासन आणि आयोजकांनी मिळून एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आणि त्यामुळे खूप गर्दी निर्माण झाली. ही गर्दी काही काळातच नियंत्रणाबाहेर गेली आणि दुर्घटना घडली.

कोण आहे निखिल सोसले?

निखिल सोसलेच्या लिंकडिन प्रोफाइलनुसार तो आरसीबीचा बिजनेस पार्टनरशिप, मार्केटिंग आणि रेवेन्यू प्रमुख आहे. निखिल सोसले हा एक आरसीबी संघातील एक प्रमुख स्टाफ मेंबर आहे जो फ्रेंचायझीसाठी पीआर आणि ब्रांड मार्केटिंगचं काम करतो. निखिल हा आरसीबी संघाच्या जबरदस्त ब्रॅण्डिंग मागचा चेहरा आहे. तो संघाला आयपीएलमध्ये एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवण्यासाठी रणनीती डिझाईन करतो.

हेही वाचा : मुंबई इंडियन्सने केलं नाही रिटेन, रोहित शर्मानंतर जवळच्या मित्रानेही तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती

निखिलची पत्नी आहे अनुष्काची खास मैत्रीण :

निखिल सोसलेची पत्नी मालविका नायक ही अनुष्का शर्माची खास मैत्रीण असून दोघी अनेकदा स्टॅन्डमध्ये एकत्र बसून आरसीबीचा सामना पाहतात. दोघी मागील अनेक वर्षांपासून एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. मालविका नायकच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार तिने Manipal Academy of Higher Education मधून एमबीएचं शिक्षण घेतलं असून ती सध्या Innoz Technologies Pvt. Ltd या बिझनेस डेव्हलमपेंट आणि पार्टनरशिपची देखरेख करते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘प्रथमोपचार प्रशिक्षण’शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

0
आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे येथे वारकऱ्यांसाठी आयोजित‘प्रथमोपचार प्रशिक्षण’शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !       पुणे - जीवनात कोणत्याही वेळी अपघाती प्रसंग किंवा वैद्यकीय मदतीची गरज उद्भवू शकते.अशा वेळी रुग्णालयात जाण्यापूर्वी मिळणारे प्रथमोपचार हे केवळ उपचार नसून ते जीवदान ठरू शकतात.सध्या सुरू झालेल्या आषाढी वारीसारख्या प्रवासादरम्यान किरकोळ दुखापतींपासून ते गंभीर आजारासारखी कोणतीही स्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी घाबरून न जाता धैर्याने परिस्थिती हाताळण्यासाठी आणि प्रत्यक्ष डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी रुग्णाची स्थिती अधिक बिघडू नये,याकरिता प्रथमोपचाराचे मूलभूत ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे, याच उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आषाढी वारी निमित्त 10 जुलै रोजी नाना पेठेतील श्रीराम मंदिर येथे सकाळी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा, एरंडवणा या ठिकाणी सायंकाळी  वारकरी बंधूंसाठी मोफत प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही शिबिराला 200 हून अधिक वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरातील सहभागी वारकऱ्यां ना प्रामुख्याने रुग्णाची श्वास पडताळणी कशी करावी आणि मनगट तसेच गळ्याची नाडी कशी तपासावी, खांदा निखळणे, बरगड्यांना अस्थिभंग होणे,तसेच हाताला दुखापत...

तेलंगणा- बलात्काराच्या आरोपीने पीडित आणि कुटुंबाची केली हत्या:आपल्या पत्नीला आणि मुलांनाही मारले; जामिनावर बाहेर...

0
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीने 6 खून केले. आरोपी राजकुमारने आधी घरी त्याच्या 30 वर्षीय पत्नीची, 4 वर्षांच्या...

स्टार्टअप फ्रंटियर 1.0:स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज– राज्यपाल जिष्णू देव...

0
ज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये, आव्हानांचे संधींमध्ये आणि कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हीच आजच्या आर्थिक प्रगतीची खरी ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जो व्यक्ती मोठ्यांचा आदर करतो, त्याला दीर्घायुष्य, विद्या, यश आणि...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जी व्यक्ती आपल्या वडिलांचा आदर करते त्याला दीर्घायुष्य, ज्ञान, सन्मान आणि सामर्थ्य...
spot_img

जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले:सिनरकडून उपांत्य फेरीत पराभव, मुचोवा-नोस्कोवा यांच्यात महिला...

0
39 वर्षीय दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत त्यांना स्वतःपेक्षा...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...
error: Content is protected !!