Homeमनोरंजनफराह खान तिला प्रसिद्ध शीला की जवानी गाणे स्वस्त म्हणतात की तिने...

फराह खान तिला प्रसिद्ध शीला की जवानी गाणे स्वस्त म्हणतात की तिने असे का म्हटले आहे


फराह खान: लोकप्रिय बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानला सगळेच ओळखतात. फराह खाननं आजवर अनेक चित्रपटातील गाणी ही रेकॉर्ड केली आहेत. फराहनं कोरिओग्राफ केलेली गाणी आजही अनेक पार्ट्यांमध्ये ऐकायला मिळतात. इतकंच नाही तर सगळ्यांना त्यावर नाचायला देखील आवडतं. ‘ओम शांती ओम’ ते ‘हॅपी न्यू ईयर’ पर्यंतच्या यशस्वी प्रवासानंतर आता फराह खान तिच्या YouTube सीरिजमुळेही चर्चेत आहे. या सीरिजमध्ये ती विविध सेलिब्रिटींच्या घरी जाते, गप्पा मारते, आणि मस्त कुकिंग सेशन्स करताना दिसते.

अलीकडेच एका एपिसोडमध्ये फराहनं ‘शीला की जवानी’ या गाण्याबद्दल मोकळेपणानं बोलली. हे तिच्या करिअरमधील एक मोठं हिट गाणं होतं, पण त्याच वेळी ते तिचं ‘सगळ्यात चीप कोरियोग्राफी’ गाण असल्याचं देखील म्हटलं आहे.

फराह खानचं ‘सगळ्यात चीप’ गाणं

फराह म्हणाली, “माझं सगळ्यात चीप गाणं म्हणजे ‘शीला की जवानी’. जर तुम्ही ते गाणं बघाल, तर लक्षात येईल की यामध्ये कोणताही सेट नाही, ना मोठं प्रोडक्शन. फक्त दहा डान्सर होते आणि आम्ही अवघ्या साडेतीन तासांत चित्रीकरण पूर्ण केलं. पण हेच गाणं माझ्या टॉप तीन-चार गाण्यांमध्ये आहे.”

सुनिधी चौहानचा आवाज आणि कतरिनाचा डान्स

विशाल-शेखरच्या जबरदस्त संगीतासोबत सुनिधी चौहानच्या दमदार आवाजानं ‘शीला की जवानी’ एकदम लोकप्रिय ठरलं . कतरिना कैफच्या बोल्ड परफॉर्मन्स आणि फराहच्या जबरदस्त कोरिओग्राफीमुळे हे गाणं ‘तीस मार खान’ चित्रपटातल्या सर्वात लक्षवेधी गाण्यांपैकी एक ठरलं. या गाण्यासाठी फराह खानला ‘बेस्ट कोरिओग्राफी’साठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

कतरिनाचं स्पष्ट मत

याआधी झी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत कतरिना कैफनंही या गाण्याबद्दल तिचं मत मोकळेपणानं व्यक्त केलं होतं. ती म्हणाली होती,” ‘शीला की जवानी’ हे मी केलेल्या गाण्यांपैकी सगळ्यात बोल्ड अगदी काहीसं अश्लील वाटणारा असा परफॉर्मन्स होता. पण तो माझ्यासाठी एक श‍िकण्याचा अनुभव ठरला. गाणं ‘आयटम नंबर’ म्हणवून घेण्यात मला काहीच वावगं वाटत नाही. यात थोडं एक्स्पोजर आहे, पण ते त्या गाण्याच्या थीमचा भाग होतं.”





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...
spot_img

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !

0
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!