भारताची अव्वल 5 श्रीमंत मंदिरे: भारत हा संस्कृती आणि धार्मिक परंपरा जपणारा देश आहे. भारताला अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. भारतात हजोर मंदिरं आहेत. भारतातील मंदिरांमध्ये भाविक उदार हस्ते दान करतात. दरवर्षी मंदिरांमध्ये दान केल्या जाणाऱ्या रकमेचा आकडा वाढत आहे. भारतातील TOP 5 श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घेऊया. भारतातील या श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील या मंदिराचे नाव आणि कमाई जाणून शॉक व्हाल.
भारतातील या मंदिरांना दरवर्षी कोट्यवधी रुपये दान म्हणून मिळतात.
पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ
पद्मनाभस्वामी मंदिर हे भारतातील पहिल्या क्रमाकांचे श्रीमंत मंदिर आहे. पद्मनाभस्वामी मंदिर केरळमधील तिरुअनंतपुरम येथे आहे. हे फक्त भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. या मंदिराची एकूण मालमत्ता 1,20,000 कोटींपेक्षा जास्त आहे. हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार पद्मनाभ यांना समर्पित आहे. या मंदिराच्या खाली एक गुप्त तिजोरी आहे. यात सोने, हिरे, रत्ने, मौल्यवान मूर्ती आणि दागिने सापडले आहेत, ज्यांचे ऐतिहासिक आणि आर्थिक मूल्य प्रचंड आहे.
तिरुमाला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर, आंध्र प्रदेश
तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात लोकप्रिय मंदिर आहे. तसेच हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मंदिर आहे. हे मंदिर तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात हे मंदिर आहे. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. या मंदिरात दरवर्षी 1,450 ते 1,613 कोटी रुपयांचे देणगी मिळते. या मंदिराची एकूण मालमत्ता सुमारे 2,50,000 कोटी असण्याचा अंदाज आहे. ज्यामध्ये रोख रक्कम, सोने, दागिने आणि रिअल इस्टेटचा समावेश आहे. रोख रकमेव्यतिरिक्त, भाविक येथे सोने, नैवेद्य आणि त्यांचे केस देखील अर्पण करतात. मंदिर ट्रस्टकडून अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य सेवा चालवल्या जातात.
सुवर्ण मंदिर, पंजाब
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर देखील भारतातील फेमस मंदिर आहे. हे मंदिर हरमंदिर साहिब म्हणूनही ओळखले जाते. हे शीख धर्मातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचा कळस सोन्याने मढवलेला आहे. मंदिराचे वार्षिक उत्पन्न सुमारे 500 कोटी आहे. या मंदिराला देश-विदेशातील भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे लंगर सेवा. दररोज एक लाखाहून अधिक लोकांना मोफत जेवण दिले जाते. हे मंदिर सामूहिक सेवा, समानता आणि करुणेच्या संदेशाचे प्रतीक मानले जाते.
वैष्णो देवी मंदिर, जम्मू आणि काश्मीर
वैष्णोदेवी मंदिर जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकुट पर्वतावर आहे. हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख शक्तीपीठांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे 1 कोटी भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराचे वार्षिक उत्पन्न 500 कोटींपेक्षा जास्त आहे. या मंदिर ट्रस्टची एकूण मालमत्ता सुमारे 500 कोटी आहे.
शिर्डी साईबाबा मंदिर, महाराष्ट्र
भारतातील TOP 5 श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिराचा देखील समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात असलेले शिर्डी साई बाबा मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. या मंदिराला दरवर्षी भारत आणि परदेशातील भाविकांकडून सुमारे 400 कोटींचे देणगी मिळते. या मंदिराची एकूण मालमत्ता सुमारे 1800 कोटी असल्याचा अंदाज आहे. रोख रकमेव्यतिरिक्त, भाविक मंदिरात सोने, चांदी, मौल्यवान वस्तू आणि मालमत्ता देखील दान करतात.





























