Homeमनोरंजनकॅश ऑन डिलिव्हरी स्कॅम इंडिया बनावट पार्सल सायबर फसवणूक सुरक्षा टिपा

कॅश ऑन डिलिव्हरी स्कॅम इंडिया बनावट पार्सल सायबर फसवणूक सुरक्षा टिपा


Cash on Delivery: घराच्या दारात कूरियर येतो, हातात छोटा बॉक्स आणि मोबाईलवर तुमचं नाव-पत्ता. तुम्ही काही ऑर्डर केलेलं नसतानाही “COD आहे, पेमेंट करा” अशी विनंती होते. घरात कोणीतरी मागवलं असेल किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्याने घेतलं असेल, असा विचार करून अनेकजण पैसे देतात. काही मिनिटांनी बॉक्स उघडल्यावर आत कागद, दगड किंवा अतिशय स्वस्त वस्तू दिसते. सध्या शहरांसोबत छोट्या गावांतही हा प्रकार वाढताना दिसतो. हा साधा गैरसमज नसून नियोजनबद्ध फसवणूक असल्याचं सायबर तज्ज्ञ सांगत आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हा प्रकार इतका विश्वासार्ह वाटतो कारण कूरियर एजंटकडे तुमची खरी माहिती असते. तो फक्त मशीनमध्ये दिसणाऱ्या तपशीलावर काम करतो. त्याला आत काय आहे याची कल्पना नसते. त्यामुळे लोक लगेच शंका घेत नाहीत.

काही वेळा आधी फोन किंवा SMS येतो — “आपलं पार्सल उद्या पोहोचेल” किंवा “परदेशातून गिफ्ट आहे, फक्त डिलिव्हरी चार्ज द्या”. उत्सुकतेमुळे लोक निर्णय घाईत घेतात आणि पैसे देतात.

कसा मिळतो तुमचा पत्ता?

ऑनलाइन शॉपिंग साइट्स, लीक डेटाबेस किंवा सार्वजनिक लिस्टिंगमधून ग्राहकांची माहिती बाहेर जाते. छोट्या विक्रेत्यांचे अकाउंट हॅक झाल्यावर नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सहज मिळतो.

फसवे लोक त्या डेटावरून तुमच्या नावाने पार्सल बुक करतात. Air Way Bill (AWB) नंबर तयार होतो आणि India Post, Blue Dart, Delhivery किंवा Ecom Express सारख्या नियमित नेटवर्कमधून पार्सल पोहोचतं. त्यामुळे सर्व काही खऱ्यासारखं दिसतं.

हा प्रकार धोकादायक का आहे?

दारात उभा कूरियर आणि छोटं बिल पाहून लोक विचार न करता पैसे देतात. रक्कम कमी असली तरी एक प्रकारचा सामाजिक दबाव तयार होतो. “इतकंच आहे, देऊया” असं वाटतं.

पेमेंट झाल्यावर कूरियर कंपनी प्रक्रिया पूर्ण करून पैसे पाठवते. डिजिटल फ्रॉडप्रमाणे त्वरित चार्जबॅक मिळत नाही. त्यामुळे नुकसान परत मिळवणं कठीण होतं.

पैसे दिले असतील तर काय कराल?

ताबडतोब संबंधित कूरियरच्या कस्टमर सपोर्टला कॉल करा आणि AWB नंबर देऊन तक्रार नोंदवा. सेटलमेंट बाकी असेल तर व्यवहार थांबवण्याची शक्यता असते.

यानंतर भारत सरकारच्या National Cyber Crime Portal (cybercrime.gov.in) वर ऑनलाइन तक्रार करा किंवा 1930 हेल्पलाईनवर माहिती द्या. लवकर कळवल्यास तपास वेगाने होऊ शकतो.

स्वतःचा बचाव कसा करावा

घरात व ऑफिसमध्ये सर्वांना सांगा — अनोळखी COD पार्सल कधीही स्वीकारू नका. आधी खात्री करा, मगच पैसे द्या.

संशयास्पद वाटल्यास पार्सल “Rejected” म्हणून परत पाठवा. फक्त नाव आणि पत्ता जुळतो म्हणून पेमेंट करू नका. थोडी खबरदारी घेतली तर ही फसवणूक सहज टाळता येते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये...

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे....

12 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेच्या कामात फायदा आणि कुंभ राशीच्यांना थांबलेले पैसे...

0
१२ जुलै, रविवार रोजी वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये फायदा होण्याची...

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

राजस्थानसह 7 राज्ये कोरडे; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंद

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपावसाचा इशारा : राजस्थानसह 7 राज्ये कोरडी; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंदभोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी करापूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र...
spot_img

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...
error: Content is protected !!