HomeमनोरंजनKnow How Chronic Kidney Disease Can Affect On Brain Health | किडनीच्या...

Know How Chronic Kidney Disease Can Affect On Brain Health | किडनीच्या समस्यांचा थेट संबंध मेंदूच्या आरोग्याशी! संशोधकांनी सांगितले कारण


दीर्घकालीन किडनी रोगाचा मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो: किडनीचे आरोग्य हे फक्त शारीरिक आरोग्याशी संबंधित आहे असे मानले जाते. पण तुम्ही हे जाणून थक्क व्हाल, एका संशोधनातून असे समोर आले आहे की किडनीच्या समस्यांचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावरही होतो. ‘द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल एसोसिएशन नेटवर्क ओपन’ या अधिकृत वेबसाईटवरील एका संशोधनानुसार, क्रॉनिक किडनीचा आजार जसजसा वाढत जातो, तसतशी बौद्धिक क्षमताही कमकुवत होत जाते. या समस्येला सामोरे जात असलेल्या व्यक्तींना कोणत्याही कामात लक्ष केंद्रीत करणे कठीण जाते. योग्यवेळी काळजी न घेतल्यास ही समस्या पुढे गंभीर स्वरूप घेऊ शकते.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

क्रॉनिक किडनीची सुरूवातीची लक्षणे कोणती?

क्रॉनिक किडनी हा मूत्रपिंडाचा एक गंभीर आजार आहे. या स्थितीत मूत्रपिंडाचे कार्य हळूहळू मंदावते आणि ते कायमचे निकामी होण्याची शक्यता असते. याची मुख्य कारणे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूतखडा ही आहेत. लघवीमध्ये बदल दिसणे, शरीरावर सूज येणे, सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, त्वचेला खाज येणे आणि कोरडेपणा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होऊन धाप लागणे ही काही सुरुवातीची लक्षणे या आजारात दिसून येतात. तसेच मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे किंवा विषारी घटकांमुळे कामात लक्ष न लागणे, विसरभोळापण किंवा चक्कर येणे अशा समस्या जाणवतात.

संशोधनातून काय समोर आले?

क्रॉनिक किडनीच्या आजाराचा मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याबाबत संशोधन करण्यासाठी टुलेन विद्यापीठ आणि अमेरिकेतली इतर संस्थांमधील संशोधकांनी एक तपासणी केली. ज्यामध्ये त्यांनी 21 ते 79 वयोगटातील 5.600 पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश होता. सर्वप्रथम संशोधकांनी या व्यक्तींच्या रक्ताचे आणि मुत्राच्या नमून्यांची चाचणी केली आणि 6 वर्षांपर्यंत त्यांच्या बौद्धिक कार्य क्षमतेचे मूल्यांकन केले. या संशोधनातून असे दिसून आले की, क्रॉनिक किडनी या आजारामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढू शकतो. याच वाढत्या रक्तदाबामुळे रुग्णांची बौद्धिक क्षमता कमकुवत होऊ शकते.

उच्च रक्तदाब ठरते मेंदूच्या समस्यांचे कारण?

शरीरातील किडनी आणि मेंदू हे दोन्ही वेगवेगळे अवयव असले तरी, ते रक्तवाहिन्यांनी जोडलेले असतात. रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे किडनीचे रक्त शुद्ध करण्याचे कार्य मंदावते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण निर्माण होऊन त्या आकुंचन पावतात किंवा फुटतात, मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. उच्च रक्तदाबामुळे मेंदूच्या अगजी लहान रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते. यामुळे मेंदूच्या आत लहान-लहान सायलेंट स्ट्रोक येत असतात. यामुळे मेंदूचा जो भाग स्मरणशक्ती, तर्कशास्त्र आणि निर्णयक्षमतेसाठी जबाबदार असतोस, तो भाग हळूहळू कमकुवत होऊ लागतो. आणि मेंदूच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी; शंकराचार्य म्हणाले- मंदिर भाजप-RSS चे कार्यालय:पोलीस टिन्नूची रिमांड मागणार; पोस्टर...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुभाष श्रीवास्तव यांना पोलीस सोमवारी फैजाबाद न्यायालयात हजर करतील. पोलीस दोघांची...

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये...

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे....

12 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेच्या कामात फायदा आणि कुंभ राशीच्यांना थांबलेले पैसे...

0
१२ जुलै, रविवार रोजी वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये फायदा होण्याची...

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...
spot_img

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...
error: Content is protected !!