प्रीटी झिंटा: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या अंतिम सामन्याने एकीकडे खूप आनंद दिला तर दुसरीकडे काहींना निराशा आणि दुःख दिले. प्रीती झिंटाच्या टीम पंजाब किंग्जला हरवून आरसीबीने ट्रॉफी जिंकली. देशभरातील चाहते विराट कोहलीसाठी आनंदी होते. दुसरीकडे प्रीती झिंटाचा चेहरा उदास होता. पण आयपीएल संपल्यानंतर चाहते आता प्रीती झिंटाला फक्त सोशल मीडियावर पाहू शकतील. पण आयपीएलनंतर ती कुठे गायब होते? जाणून घेऊया.
प्रीती झिंटा बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे. ती लवकरच चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. तिने सनी देओलच्या ‘लाहोर 1947’ चित्रपटात काम केलंय. पण हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होईल की नाही? हे अद्याप निश्चित झालेले नाही. प्रिती शेवटची 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भैयाजी सुपरहिट’मध्ये दिसली होती.
प्रीती झिंटा कुठे गायब झाली?
प्रीती झिंटाने बऱ्याच काळापासून अभिनयापासून ब्रेक घेतलाय. पण ती लवकरच परतणार आहे. ज्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. बरं प्रीती झिंटा तिच्या घरी परतलीय. भारतीय चाहत्यांना तिची झलक फक्त सोशल मीडियावरच दिसेल. खरंतर प्रिती तिचा पती जीन गुडइनफसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. 2016 मध्ये तिचे लग्न झाले. लग्नानंतरच ती तिथेच शिफ्ट झाली. प्रिती भारतात येत राहते पण आयपीएल दरम्यान ती सर्वात जास्त दिसून येते.
2021 मध्ये प्रीती झिंटा सरोगसीद्वारे एका मुलाची आणि एका मुलीची आई बनली. प्रिती अनेकदा तिचा मुलगा जय आणि मुलगी जियासोबतचे फोटो शेअर करते. पण त्यांचा चेहरा लपवून ठेवला जातो. माझ्या मुलांचे जबरदस्तीने फोटो काढण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असे ती सांगते. ती हिंदू धर्मानुसार मुलांचे संगोपन करते.
आयपीएलचे काम संपताच ती तिच्या कुटुंबासोबत राहण्यासाठी लॉस एंजेलिसला जाते. प्रिती बेव्हरली हिल्समधील एका मोठ्या घरात तिच्या कुटुंबासह राहते. काही काळापूर्वी तिने तिच्या मुलांचा एक फोटो शेअर केला होता. मी दोघांनाही खूप मिस करतेय, अशी कॅप्शन तिने लिहिली होती.
2 चित्रपटांमध्ये दिसू शकते
प्रीती झिंटा लवकरच सनी देओलसोबत दिसणार आहे. ती लाहोर 1947 मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. तिच्याबद्दलची आणखी एक बातमी अलीकडेच समोर आली आहे. ती हृतिक रोशनच्या ‘क्रिश 4’ मध्ये देखील दिसू शकते. प्रियांका चोप्राने आधीच या चित्रपटात एन्ट्री केलीय. प्रितीचा पुढील चित्रपट कधी येईल? याची तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.





























