Homeमहाराष्ट्रउधव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती संबंधित महाराष्ट्र राजकारण बिग अपडेट

उधव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती संबंधित महाराष्ट्र राजकारण बिग अपडेट


महाराष्ट्र राजकारण: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसंदर्भात सकारात्मक वक्तव्य येताहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार असी अटकळ बांधली जात आहे. त्यातच याविषयी एक महत्त्वाची अपडेट  समोर आली आहे. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीआधी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी दोन्ही पक्षांतील नेतेही सकारात्मक असल्याचा पाहायला मिळतंय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेत्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रीया दिली.

राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर शिवसेना UBT आणि मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक वक्तव्य करत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा कायम ठेवली होती. त्यातच दोन दिवसांपासूर्वी उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केले. उद्धव यांचं वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचे स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जातंय.

राज ठाकरेंनी पहिली टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्युनिअर ठाकरे आदित्य आणि अमितही या युतीसाठी सकारात्मक असल्याचा पाहायला मिळालं. मात्र पुढलं पाऊल कोण टाकणार असी चर्चा असताना ठाकरेंच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. आता या मनोमिलनामध्ये त्यांना कितपत यश येतंय ते पाहणं महत्वाचं आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही बंधूंकडून युतीसाठी  सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ठाकरेंची मामा चंदूकांत वैद्य यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं सांगितलंय.. त्यामुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळताहेत. गेली अनेक वर्ष  राज आणि उध्दव ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं चंदू मामा यांनी म्हटलंय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!:ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

0
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे...

पराग अग्रवाल यांनी समांतर वेब सिस्टिम सुरू केली; 19 हजार कोटी कमावतो

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापराग अग्रवाल हे भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पद सोडताना पराग...

दैनिक राशिभविष्य 11 जुलै 2026 मेष राशीसाठी उत्पन्न वाढेल सिंह राशीसाठी पैसे अडकले आहेत

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा११ जुलै, शनिवारी मेष राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांना मुलांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...
spot_img

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
error: Content is protected !!