Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकहिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ झालाच पाहिजे !

हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ झालाच पाहिजे !

महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतील १६० हून अधिक संघटनांची मागणी

हजारोंच्या संख्येने हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग

महाराष्ट्रात वाढत्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर २० जिल्ह्यांतील १६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत राज्य सरकारकडे चालू हिवाळी अधिवेशनात कठोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे. या आंदोलनात १६०० पेक्षा अधिक हिंदुत्वनिष्ठांनी सहभाग घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश–राजस्थान धर्तीवरील कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात केली.
     जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी २० जिल्ह्यांमध्ये हजारोंच्या संख्येने महिला व  हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रित येत स्थानिक जिल्हा आणि तालुका प्रशासनाला तसेच स्थानिक लोकप्रतीनिधींनाही निवेदने दिली.
      संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल, मुख्यमंत्री व गृह विभागाला दिलेल्या निवेदनात लव्ह जिहादला बळी पडलेल्या हिंदू युवतींच्या विविध घटनांचा उल्लेख केला आहे. नगर येथील ७ वीत शिकणाऱ्या मुलींवर झालेला सामूहिक अत्याचार, कोल्हापूर इचलकरंजी येथे ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार, शाहुवाडीतील १४ वर्षीय मुलीवर बलात्कार, तसेच श्रद्धा वालकर, रुपाली चंदनशिवे, तनुष्री शर्मा यांच्या हत्या प्रकरणांचा संदर्भ देत ‘लव्ह जिहाद’ ही वैयक्तिक गुन्हेगारी नसून संघटित कट असल्याचे नमूद केले आहे.
    देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, आसाम, उत्तराखंड या राज्यांनी जबरदस्तीने होत असलेले धर्मांतर व फसवणूक रोखण्यासाठी कठोर कायदे लागू केले आहेत.
    महाराष्ट्र राज्यही उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यांच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायद्यात आजन्म कारावासाची तरतूद असावी, गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र घोषित करावेत, तक्रार करण्याचा अधिकार पीडितांसह कोणत्याही नागरिकाला असावा, विशेष पोलीस शाखा आणि ‘रणरागिणी’ पथकाची स्थापना करावी, विदेशातून येणारा निधी, जिहादी नेटवर्क आणि तस्करीचा सखोल तपास करून मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जलद तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसारित करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

जनभावनांना प्रतिसाद देत आमदार-मंत्र्यांकडून लव्ह जिहाद व अँटी लँड ग्रॅबिंग

कायद्यासाठी आश्वासन

लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि अँटी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध) कायद्याविषयी राज्यभरातील विविध आमदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली. या निवेदनांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल जावळे, सुरेश भोळे, अनुप अग्रवाल, प्रवीण दटके, कृष्णाजी खोपडे, तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, किशोर जोरगेवार, करण देवतळे, देवराव भोंगळे, सुधीर मुनगंटीवार, विक्रमसिंह पाचपुते आणि खासदार अनुप धोत्रे आदींनी या विषयात गंभीर भूमिका घेतली. अनेक लोकप्रतिनिधींनी हा कायदा करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून काहींनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. सर्वांनी मिळून या दोन्ही महत्त्वपूर्ण कायद्यांसाठी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

घरी बोलावून बॉयफ्रेंडची हत्या, कुऱ्हाडीने मान कापली:फरीदकोटमध्ये हात-पाय आणि तोंड बांधले; वडील पंजाब पोलिसात...

0
फरीदकोटमध्ये प्रियकराला घरी बोलावून त्याची हत्या करण्यात आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, महिलेने त्याला भेटण्यासाठी बोलावले होते, परंतु महिलेचा पती, भाऊ आणि तिने मिळून तरुणाचे...

कथा: व्यापाऱ्याला सेवकाची शिकवण:एक छोटीशी चूक आपल्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, प्रत्येक परिस्थितीत...

0
एक लोककथा आहे. एका राज्यात एक अत्यंत कुशल व्यापारी होता. त्याची बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि व्यवस्थापन क्षमता अद्भुत होती. राजा देखील त्याच्या योग्यतेने प्रभावित...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

0
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी...
spot_img

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
error: Content is protected !!