Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकमहसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध...

महसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध !

सूचना आणि हरकती यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढीचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन !

मुंबई – महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाचा मसूदा त्वरित रहित करावा, या मागणीसाठी अष्टविनायक मंदिरे, विदर्भ देवस्थान समिती, विविध प्रमुख मंदिरांचे विश्वस्त, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पदाधिकार्‍यांची २६ मे या दिवशी मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मंदिर विश्वस्तांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात येईल’, असे सांगितले. यासह राज्यातील मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमण हटवण्याचे आणि वरील प्रस्तावित कायद्याच्या मसूद्याविषयी हरकती व सूचना नोंदवण्याची ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.
या बैठकीला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू रावकर, श्री मयुरेश्वर (मोरगांव), श्री चिंतामणी (थेऊर), श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक), श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर आदीचे व्यवस्थापन पहाणारे ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’चे विश्वस्त श्री. केशव विद्वांस, पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. जितेंद्र गद्रे आणि उपाध्यक्ष श्री. वैभव आपटे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, विदर्भ देवस्थान समिती संस्थापक अध्यक्ष श्री. अनुप जैस्वाल, अमरावती येथील श्री पिंगळाई माता देवस्थानचे श्री. विनोद पाखोडे यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पदाधिकार्‍यांनी मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणे, मंदिरांचे पुजारी, विश्वस्त यांच्या सविस्तर अडचणी महसूलमंत्र्यांपुढे मांडल्या. तसेच प्रस्तावित कायद्यातील गंभीर त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.
‘मंदिरांच्या इनामी भूमीची विक्री करण्याऐवजी मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणे हटवण्याविषयी महाराष्ट्र सरकारने कार्यवाही करावी’, अशी मागणी मंदिर विश्वस्तांनी केली. यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ‘या अधिनियमाविषयी अधिकाधिक विश्वस्तांना सूचना आणि हरकती नोंदवता याव्यात, यासाठी विभागीय आयुक्तांसह तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथेही घेण्याची सूचना देऊ’, असे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले.
प्रस्तावित कायदा रहित होईपर्यंत तीव्र विरोध कायम राहिल ! – मंदिर महासंघ
महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाला समस्त मंदिर विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचा ठाम विरोध आहे. सरकार हिंदुत्वनिष्ठ आहे. त्यामुळे सरकारने मंदिरांच्या हिताचा कायदा आणावा. जोपर्यंत मंदिरांच्या इनामी भूमी विक्रीसाठीच्या या प्रस्तावित कायद्याचा मसूदा रहित केला जात नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहिल. राज्यातील सर्व मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भाविक आणि समस्त नागरिक यांनी या अधिनियमाच्या विरोधात लवकरात लवकर सूचना आणि हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी या वेळी माध्यमांशी बोलतांना केले
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA Paper Leak व्याख्या; पॅनेलद्वारे सीबीएसई ओएसएम निविदा प्रश्न

0
नवी दिल्ली31 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानीट पेपरफुटी आणि CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीशी संबंधित विवादांची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)...

Saptahik Rashifal (Weekly Horoscope) | Saptahik Rashifal (8 To 14 June 2026), Weekly Zodiac...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsSaptahik Rashifal (Weekly Horoscope) | Saptahik Rashifal (8 To 14 June 2026), Weekly Zodiac Forecast: Singh Rashi, Kanya, Aries, Taurus,...

अफगाणिस्तानवर फॉलोऑनचे संकट:भारताने 113 धावांत 5 विकेट घेतल्या, अफगाणिस्तान 451 धावांनी मागे; सुथारला 3...

0
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तानने 113 धावांत 5 विकेट गमावल्या. संघ...

पोलिस अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर घोटी येथे पिकवले "मियाझाकी” आंबे:4 वर्षांत 8 किलो उत्पादन‎, भारतात किलोला...

0
स्थानिक गुन्हे शाखेतून निवृत्त झालेले आणि मूळचे‎नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील असलेले किसन‎‎नजन पाटील यांनी आपल्या चार‎‎वर्षांच्या अथक मेहनतीतून‎‎जपानमधील अत्यंत दुर्मिळ‎‎मानला जाणारा "मियाझाकी''‎‎आंबा घोटी...
spot_img

अफगाणिस्तानवर फॉलोऑनचे संकट:भारताने 113 धावांत 5 विकेट घेतल्या, अफगाणिस्तान 451 धावांनी मागे; सुथारला 3...

0
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या नावावर राहिला. न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तानने 113 धावांत 5 विकेट गमावल्या. संघ...

वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील

0
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...

पुरुष आता कुटुंबाला जास्त वेळ देत आहेत:अमेरिकेत यासाठी 30% कमी पगाराची नोकरीही मान्य, भारतातही...

0
अमेरिकेतील पदवीधर नोकरदार वडील आता करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी किंवा जास्त कमावण्याऐवजी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. थिंक टँक अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर बॉईज अँड...

जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- ‘पेड्डी’ वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप...

0
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन...
error: Content is protected !!