Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकअनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन...

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

 

पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे घ्यावी लागली, हिंदूंच्या संघटित शक्तीच्या विजयामुळे हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.

पुरातत्व विभागाने फुले वाड्यातील पारंपारिक वटपूजनावर बंदी घालणारा आदेश काढला होता. या निर्णयाविरुद्ध हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, रणरागिणी शाखा,विश्व हिंदु परिषद, दुर्गा वाहिनी आणि स्थानिक महिला यांनी तीव्र लढा दिला. या सर्वांच्या संघटित प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि ही बंदी उठवण्यात आली.

या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. सौ. मेधा कुलकर्णी याही सहभागी झाल्या आणि त्यांनीही वटपूजन केले. वटपौर्णिमा हा केवळ सण नसून तो निसर्ग संवर्धनाचा वैज्ञानिक संदेश देणारा सण आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.मुला-मुलींवर होणारे संस्कार, पालकांशी असलेला संवाद आणि कौटुंबिक मूल्यांचे जतन करण्याची आज नितांत आवश्यकता आहे.तसेच त्यांनी सनातन भारतीय संस्कृती आणि संस्कारांचे महत्त्वही अधोरेखित केले

सौ. उज्वला गौड (सरचिटणीस, भारतीय महिला मोर्चा, पुणे शहर) यांनी सनातन धर्मात वटवृक्षाला साक्षात श्री विष्णूंचे रूप मानले जाते अशी श्रद्धा असल्याचे मत व्यक्त करत सत्यवान आणि सावित्री या पौराणिक कथेचा संदर्भ दिला.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर म्हणाल्या की, “काही संघटनांनी येथे पूजन बंद करण्याची मागणी केली होती आणि त्यानुसार पुरातत्व विभागाने आदेशही दिले होते. मात्र, स्थानिक महिला, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि खासदार प्रा.डॉ.मेधाताई कुलकर्णी या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच आज येथे पुन्हा एकदा पूजा उत्साहात संपन्न होऊ शकली”.

या यशस्वी सोहळ्यात हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा, सकल हिंदू समाज,स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या थोरात, मृणाल कांबळे, स्नेहा माळवदे,सौ.उज्वला गौड, सरचिटणीस, भारतीय महिला मोर्चा, पुणे शहर
आणि मोठ्या संख्येने स्थानिक महिला सहभागी झाल्या होत्या.
स्थानिक महिलांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी केला तसेच खासदार प्रा. डॉ.मेधाताई कुलकर्णी यांनी उपस्थित काही महिलांचा सत्कारही केला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चेतन म्हणायचा- लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होणार:पैशांची व्यवस्था सिया करेल; वाचा- केतन हत्याकांडातील आरोपीच्या मित्रांचे...

0
पुण्यात 18 जून रोजी केतन अग्रवाल हत्याकांडात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याबाबत सतत नवीन खुलासे होत आहेत....

आषाढ महिना सुरू:देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू, 29 जुलैला गुरुपौर्णिमा; जाणून घ्या आषाढ महिन्याशी संबंधित...

0
आज (मंगळवार, 30 जून) पासून आषाढ महिना सुरू झाला आहे. हा हिंदू पंचांगातील चौथा महिना आहे. बुधवार, 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेसोबत आषाढ संपेल...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

जालन्यात पोलिसांचा ‘अँटी-ड्रग्ज’ पॅटर्न:3 हजार नशेच्या गोळ्या जप्त, महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगार न करता पालकांना...

0
जालना शहरात नशेच्या बटण गोळ्या ‎विक्री व बाळगणाऱ्यांवर कारवाया ‎केल्या जात आहे. वर्षभरात 3 हजार ‎‎नशेच्या गोळ्या जप्त करून 16 ‎आरोपी निष्पन्न केले.‎दहशतवादविरोधी...
spot_img

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....
error: Content is protected !!