Homeमहाराष्ट्रमुंबई लोकल ट्रेन अपघात नेते सीएम डेवेंद्र फडनाविस विजय वाडेतिवार यांनी रेल्वे...

मुंबई लोकल ट्रेन अपघात नेते सीएम डेवेंद्र फडनाविस विजय वाडेतिवार यांनी रेल्वे मंत्री स्लॅमस रिस्पंट्सने अश्विनी वैष्णाचा राजीनामा मागितला.


मुंबई लोकल ट्रेन अपघात: मुंबईमधील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन लोकल ट्रेनमध्ये दारात उभं राहून प्रवास करत असेलल्या प्रवाशांचा ट्रॅकवर पडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणामध्ये रेल्वेच्या प्रवक्त्यांनी अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील रेल्वेच्या दारात उभ्या राहिलेले प्रवाशी एकमेकांना घासले गेले आणि त्यामध्येच ते ट्रॅकवर पडल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र आता या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया समोर येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

लाखो प्रवाश्यांना रोज जीव मुठीत घेऊन लटकून प्रवास करावा लागतो

“रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल होत आहे,” असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. “मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लाखो प्रवाश्यांना रोज जीव मुठीत घेऊन लटकून प्रवास करावा लागतो. अश्याच 6 प्रवाशांचा आज अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे,” असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते अशा

“सामान्य मुंबईकर जीव मुठीत घेऊन लटकत ट्रेनमधून पोटापाण्यासाठी प्रवास करतात. हा लोकल ट्रेनचा प्रवास आता मुंबईकरांच्या जीवावर उठला आहे. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. महायुती सरकारने आता तरी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा,” असं वडेट्टीवार म्हणालेत. “मुंबईतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही, गर्दीच्या वेळी अधिकच्या ट्रेन सोडल्या जात नाही, तिथे अधिक लाईन टाकल्या जात नाही, ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते अशा मुंबई लोकलच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वेमंत्री फक्त रिल्स बनवण्यात व्यस्त असतात,” असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सुप्रिया सुळेंचं प्रवाशांना आवाहन

“ट्रेनमधून खाली पडल्यामुळे पाच प्रवाशांना प्राण गमावावे लागले. दिवा – मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या गाडीत प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करीत होते. अशा पद्धतीने प्रवास करणे धोकादायक आहे. नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया आपण धोकादायक पद्धतीने प्रवास करु नये. यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेसचा धक्का लागल्याने काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला; ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजस्थानसह 7 राज्ये कोरडे; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंद

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपावसाचा इशारा : राजस्थानसह 7 राज्ये कोरडी; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंदभोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी करापूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र...

आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!:ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

0
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे...

पराग अग्रवाल यांनी समांतर वेब सिस्टिम सुरू केली; 19 हजार कोटी कमावतो

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापराग अग्रवाल हे भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पद सोडताना पराग...

दैनिक राशिभविष्य 11 जुलै 2026 मेष राशीसाठी उत्पन्न वाढेल सिंह राशीसाठी पैसे अडकले आहेत

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा११ जुलै, शनिवारी मेष राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांना मुलांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी...
spot_img

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
error: Content is protected !!