Homeमहाराष्ट्रThackeray brothers alliance Make Impact on MVA ; ठाकरे बंधूंच्या युतीमुळं मविआचं...

Thackeray brothers alliance Make Impact on MVA ; ठाकरे बंधूंच्या युतीमुळं मविआचं काय होणार? भवितव्यावर महायुतीचं प्रश्नचिन्ह


ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशामध्ये स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे महत्त्वाचा घटक असलेल्या महाविकास आघाडीचं काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन ठाकरेंनी एकत्र येणं नव्या राजकीय समीकरणाचा प्रारंभ ठरणार असेल, तर तीच महाविकास आघाडीच्या समारोपाची नांदी ठरणार नाही ना असा प्रश्नही आता विचारला जात आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांना आता जोर आलाय. ठाकरे बंधूंही युतीसाठी अनुकूल आहेत. दुसरीकडं उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिकही युतीबाबत प्रचंड आशावादी आहेत. सगळ्यांना युती व्हावी असंच वाटतंय. उद्धव ठाकरेंनीही सगळ्यांच्या मनासारखं होईल असं सांगून टाकलंय. पण ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडीचं अस्तित्व काय असणार असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. राज ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही हे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय. राज ठाकरे महाविकास आघाडीत राहणार की नाही असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी विचारला आहे.

राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यानं महाविकास आघाडी आणखी मजबूत होऊ शकते असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. दोन्ही भावांचे हातात हात घेऊ द्या मग तिसरा हात कसा द्यायचा ते पाहू असंही काँग्रेसनं सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसही ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत प्रचंड आशावादी आहे. राष्ट्रवादीला मविआच्या भवितव्याची काळजी वाटत नाही आहे. आगामी निवडणुका पाहता मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाविकास आघाडीचा फायदा होण्याऐवजी अडचणच जास्त होणार आहे. त्यामुळं ठाकरे बंधूंची युती झाल्यास मविआ मोडीत निघण्याची शक्यता थोडी जास्त वाटू लागली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पराग अग्रवाल यांनी समांतर वेब सिस्टिम सुरू केली; 19 हजार कोटी कमावतो

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापराग अग्रवाल हे भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पद सोडताना पराग...

दैनिक राशिभविष्य 11 जुलै 2026 मेष राशीसाठी उत्पन्न वाढेल सिंह राशीसाठी पैसे अडकले आहेत

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा११ जुलै, शनिवारी मेष राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांना मुलांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...
spot_img

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
error: Content is protected !!