Homeमहाराष्ट्र'Rigging' in Maharashtra assembly elections! Will give evidence in court - Prithviraj...

‘Rigging’ in Maharashtra assembly elections! Will give evidence in court – Prithviraj Chavan | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत ‘हेराफेरी’: न्यायालयात पुरावे देणार – पृथ्वीराज चव्हाण; बावनकुळेंवरही साधला निशाणा – Kolhapur News

विधानसभा निवडणूक निकालात हेराफेरी झाली आहे. त्या संदर्भातील पुरावे उच्च न्यायालयातील याचिकेच्या सुनावणीवेळी सादर करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

?

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून उमेदवार होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, पराभवाची कारणमीमांसा करताना निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे पुरावे समोर आल्यानंतर त्यांनी निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निकालानंतर तातडीने मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे (जिल्हाधिकारी) माहिती मागवली होती. त्यांनी दिली नाही. या सर्व बाबी आम्ही सुनावणीवेळी न्यायालयात मांडू. तसंच हेराफेरीचे पुरावेही सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विकसित भारत होणार आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेमुळं येत्या दहा-पंधरा वर्षात विरोधकांना देशात संधी दिसत नाही. त्यामुळेच राहुल गांधींनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विकसित भारत होणार आहे का? विकसित भारताचं दिवास्वप्न दाखवून तुम्ही लोकांची फसवणूक का करताय? भारत कसा विकसित होईल याची आधी चर्चा करा.

तिबार मतदान केल्याचा आरोप

राज्याच्या काही भागात मतांचा टक्का वाढल्याचं सांगत निकालाचे समर्थन करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ‘चार महिन्यात इतकी मतं कशी वाढली’? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. दुबार, तिबार मतं तुम्हीच नोंदवू दिली आणि शाई पुसून त्यांनी दुबार, तिबार मतदान केल्याचा थेट आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

निवडणुकीतील हेराफेरी मॅच फिक्सिंगसारखीच

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेली हेराफेरी ही मॅच फिक्सिंगसारखीच आहे. फिक्सिंग करणारा संघ सामना जिंकू शकतो. भाजपचा विजय तसाच आहे. मॅच फिक्सिंगने होणाऱ्या निवडणुका लोकशाहीसाठी घातक असतात. तसेच निवडणूक प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला तडा जाऊन कधीही भरून न येणारे नुकसान होते, असं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी त्यांच्या लेखात म्हटलंय. त्यांच्या लेखामुळे देशातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. त्यासंदर्भातच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

हे ही वाचा…

जनतेचा विश्वास मिळवा, खोटे आरोप थांबवा:राहुल गांधींच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पलटवार; आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘चोरी’ केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, राहुल गांधींना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दैनिक राशिभविष्य 11 जुलै 2026 मेष राशीसाठी उत्पन्न वाढेल सिंह राशीसाठी पैसे अडकले आहेत

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा११ जुलै, शनिवारी मेष राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांना मुलांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

मुंबई मनपाच्या महासभेत महापौर-विरोधक आमनेसामने:ट्रोलिंग, धमक्या, पावसाळी दुर्घटना आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार खडाजंगी

0
मुंबई महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मरिन ड्राईव्हवरील व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या ट्रोलिंगला...
spot_img

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
error: Content is protected !!